online study no network.jpg 
नाशिक

"नेटवर्कसाठी जावं लागतयं एक किलो मीटर डोंगरावर"..ऑनलाइन अभ्यास करायचा कसा?

विजय पगारे

नाशिक / इगतपुरी : तालुक्यासह संपुर्ण नाशिक जिल्हयात कोरोनाने एकीकडे धुमाकूळ घातला असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरु केला आहे. मात्र शहरी भागात चांगले नेटवर्क (रेंज) असल्यामुळे विद्यार्थी अँड्रॉइड मोबाईलवर अभ्यास करू शकतात. मात्र ग्रामीण भागात अजून ही बरीच अशी गावे आहेत की त्या ठिकाणी मोबाइल नेटवर्कच मिळत नाही. मोडाळे गावात तर नेटवर्कसाठी मुलांना एक किलोमीटर पायीपीट करीत डोंगरावर रेंज शोधण्यासाठी जावे लागत आहे.

मोबाइल असूनही नसल्यासरखाच
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव सगळीकडे डोंगररांगानी वेढलेले आहे. त्यामुळे या गावात कोणत्याच मोबाइल कंपनीला नेटवर्क मिळत नाही असे असताना शासनाने मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरु केला आहे. कोरोनाच्या धर्तीवर हा पर्याय जरी योग्य असला तरी ग्रामीण डोंगराळ ,आदीवासी व दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क मिळत नाही त्यामुळे मोबाइल असूनही नसल्यासरखाच आहे, मोडाळे गावात देखील अशीच परिस्थिति असल्याने विद्यार्थ्यांना चक्क आपल्या फोनच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी एक किमी पायी चालत डोंगरावर जावे लागत आहे.

नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांनी लक्ष द्यावे
याठिकाणी मोबाईलची रेंज असल्याने विद्यार्थ्यांना डोंगरावर जाताना ही सर्प,विंचू अशा विषारी प्राण्यांच्या भीतीने आपला जीव मुठीत धरून हा अवघड अभ्यासक्रम करत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण देताना शिक्षकांना ही या कठीण परिस्थितिला सामोरे जावे लागत आहे,आणि विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी मोबाईल नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांसह पालकवर्गाकडुन होत आहे.

अभ्यास कुठून होणार?

आमच्या गावात कुठल्याही मोबाईल नेटवर्क ला कवहरेज येत नाही परिणामी फोन करायचा असल्यास गावा शेजारील डोंगरावर जावे लागते ग्रामपंचायतच्या वतीने मागणी देखील केली असताना कुठलीच नेटवर्क कंपनी दखल घेत नाही.  - मंगला बोंबले सरपंच,मोडाळे 

इगतपुरी तालुक्यातील आमच्या मोडाळे गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही आणि गावातील प्रत्येक पालकांची अँड्रॉइड मोबाईल घेण्याची ऐपत नाही आहे विशेष म्हणजे गावात नेटवर्क नाही मिळत तर अभ्यास कुठून होणार - हरिदास सूर्यवंशी ,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती,मोडाळे 

मोडाळे गावासह पंचक्रोशीत  कुठल्याच कँपनील नेटवर्क मिळत नसून तसा अहवाल देखील यापूर्वीच आम्ही शासनाकडे पाठवाला आहे दरम्यान विद्यार्थ्यांनी आपला जीव मुठीत धरून डोंगरावर जाऊ नये शाळा सुरु होईपर्यंत पालकांनी दक्षता घ्यावी मोबाईल नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांनी लक्ष द्यावे   - चंद्रभागा तुपे ,मुख्यध्यापिका, जिल्हा परिषद प्राथ शाळा ,मोडाळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Hingoli News: तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले; अमेरिका-इराण युद्धाची झळ आली स्वयंपाकघरापर्यंत

SCROLL FOR NEXT