(टीप – सदरची बातमी जाहिरातदार संस्थेचे असून फोटोसह प्रसिध्द करावी ही विनंती)
फोटो-22985
वडझिरे ः नवीन शैक्षणिक धोरण यावर झालेल्या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांसह डॉ. कुणाल कातकाडे, डॉ. टी. के. खैरनार, डॉ. आरती लोखंडे.
कातकाडे महाविद्यालयात
शैक्षणिक धोरण कार्यशाळा
सिन्नर, ता. ७ ः वडझिरे येथील धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या एसएसके महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याची कार्यप्रणाली यावर कार्यशाळा झाली. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. टी. के. खैरनार, संस्थेच्या संचालिका उज्ज्वला कातकाडे, हिरे महाविद्यालयाच्या संशोधन केंद्र संचालिका डॉ. आरती लोखंडे उपस्थित होत्या.
प्राचार्य खैरनार यांनी धनलक्ष्मी शिक्षण संस्थेची वाटचाल तसेच पदवीनंतर पदव्युत्तर टप्प्यापर्यंतचा प्रवास याबाबत माहिती दिली. डॉ आरती लोखंडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याची कार्यप्रणालीवर माहिती दिली.
संस्थेचे डॉ. कुणाल कातकाडे यांनी जिद्द व चिकाटीवर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते. त्यासाठी मेहनत गरजेची असल्याचे सांगितले. शैक्षणिक धोरणातील बदल आत्मसात करून विद्यार्थी अधिक सर्वगुणसंपन्न घडविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागप्रमुख प्रा. प्रल्हाद पानसरे, प्रा. गोरख वाघले, प्रा. शुभम जाधव, प्रा. सतीश कापडी, प्रा. सुरेश थोरात, प्रा. शुभांगी आव्हाड, प्रा. डॉ. ज्योती गायकवाड प्रा. योगेश चौधरी प्रा. सोनाली खुर्चे, प्रा. वैशाली रिपोटे, प्रा. नर्गिस अन्सारी आदींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. डॉ. मंगल सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.