New Rohitra
New Rohitra esakal
नाशिक

District Annual Plan : सिन्नर तालुक्यात 19 गावात नवे रोहित्र; वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार

सकाळ वृत्तसेवा

District Annual Plan : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील १९ गावांत १ कोटी १७ लाखातून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत.

त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. (New Rohitra in 19 villages in Sinnar Taluka will help in smooth power supply District Annual Plan Nashik News)

विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रोहित्र बसविण्याची मागणी आमदार कोकाटेंकडे केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत मंजुरीसाठी आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.

त्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार १०० केव्ही क्षमतेच्या रोहित्रांसाठी उजनी येथील पवार वस्तीसाठी १३ लाख १४ हजार, खंबाळे येथे १२ लाख ३७ हजार, चानखन बाबानगर वडांगळी येथे ९ लाख ५२ हजार,

डावरे मळा मीठसागरे येथे ८ लाख, ढमालेसर वस्ती दुसंगवाडी ७ लाख ९० हजार, पांगरी बु ९ लाख १६ हजार, पंचाळे १० लाख ७४ हजार, भरडी मळा १० लाख ६० हजार, शहा येथे ८ लाख ३७ हजार, साकूर येथे ६ लाख ८९ हजार व ७ लाख ३८ हजाराचे दोन स्वतंत्र रोहित्र,

सातवस्ती देवपूर येथे ७ लाख १० हजार, चिंचोली रोड सायाळे येथे ५ लाख ८८ हजार, लोणारवाडी येथे जामखेड मळा येथे रोहित्रासह कनेक्शनसाठी १० लाख १४ हजार, हनुमान मंदिर चास येथे ८ लाख २९ हजार,

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

वडगाव पिंगळा येथे श्रीमती.शैलाबाई गायधनी व इतर ७ जणांना कनेक्शन देण्यासाठी ३ लाख १६ हजार, सरदवाडी येथे ६३ केव्हीए रोहित्रासाठी ६ लाख ८९ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. कार्यारंभ आदेश होऊन या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

ब्राम्हणवाडेला कबड्डी मॅट..

ग्रामीण भागात कबड्डी हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. ब्राम्हणवाडे येथे कबड्डीची मॅट बसविण्याची मागणी कबड्डीपटू व तरुणांकडून करण्यात येत होती. आमदार कोकाटे यांनी जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून कबड्डी मॅटसाठी ८.५० लाख रुपये निधी मंजूर करून आणला.

त्यामुळे कबड्डी खेळणाऱ्या युवकांचे मॅटवर कबड्डी खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तरुणांनी आमदार कोकाटे यांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT