पान दोन ॲंकर
--------------
08890, 08892
सर्वतीर्थ टाकेद : शालेय इमारतीचे लोकार्पण दरम्यान वासुदेव बत्रा व कुटुंबीय. शेजारी सरोज जगताप, बाळासाहेब मुंडे, दीपक खैरनार. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी.
सर्वतीर्थ टाकेद जिल्हा परिषद शाळेचा कायापालट
अद्वैत फाउंडेशनचा पुढाकार; लोकार्पण सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.३ : सर्वतीर्थ टाकेद (ता.इगतपुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा नूतन शालेय इमारतीचा लोकार्पण सोहळा अद्वैत फाउंडेशनचे (मुंबई) पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रम दरम्यान टाकेद गावातून बैलगाडीतून माध्यमिक महर्षी वाल्मीकी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत मिरवणूक काढत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी शिक्षक व टाकेद ग्रामस्थांनी हा सोहळा साजरा केला.
अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाद्याच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले. नव्या युगाच्या पाऊल खुणा ओळखून गुणवत्तेचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या अद्वैत फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसाहाय्यातून साकारलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेदच्या नूतन व अत्याधुनिक वास्तूचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वासुदेव चतरुमल बत्रा, प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप, अद्वैत फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष मोहन करारी, कमल बत्रा, शांताकमल बत्रा, गटविकास अधिकारी महेश वळवी, साहाय्यक गटविकास अधिकारी चिमाजी गोडे, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर सोनवणे, मंजूषा साळुंके, प्रमोद चिंचोले, केंद्र समन्वयक प्रदीप खैरनार, कॉन्ट्रॅक्टर कपिल नरेंद्र खोम्बादिया, संजीव बोरसे, बाळासाहेब टोचे, सिंधुसागर एज्युकेशन सोसायटीचे दिनेश बदलानी, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे,रतन बांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी मुंडे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करत बत्रा कुटुंबीयांचे आभार मानले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी मनोगतात व्यक्त होताना अद्वैत फाउंडेशनच्या संपूर्ण बत्रा कुटुंबाचे शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानले. हरिश्चंद्र भाग्यवंत सूत्रसंचालन तर जगन गांगड यांनी आभार मानले.
यावेळी निवृत्ती नाठे, श्यामकांत बोरसे, मुख्याध्यापिका अरुणा पवार, सुजाता आहेर, विनोद पाटील, जगन्नाथ गांगड, नारायण सोनवणे, संजय लोहरे, सोनाली निकम, राजेश गावित, उमेश गरुड, शिवाजी भगत, विनायक पानसरे, चंद्रकांत भांगरे, माजी मुख्याध्यापक नवनाथ आढाव, राम शिंदे, सोनाली नवले, तुषार लहामटे, छाया भांगे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.