suraj mandhare
suraj mandhare 
नाशिक

जिल्ह्यात दुकानांसाठी नव्या वेळा निश्चित; रात्री नऊपर्यंत राहणार सुरू

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात दुकानांसाठी नव्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गुरुवार (ता.१५)पासून सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, बार सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत. पूर्वीचे जुने सगळे आदेश रद्द करून एकाच प्रकारचे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्ह्यात दुकानासाठी सकाळी सात ते रात्री आठ, मद्यविक्री करणारी हॉटेल/बारसाठी सकाळी अकरा ते रात्री नऊ, मद्यविक्री न करणाऱ्या हॉटेलसाठी सकाळी आठ ते रात्री नऊ तसेच वाइन शॉपसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सात अशा वेळा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यात आलेल्या होत्या. मात्र, शासनाने वरील अधिसूचनेच्या परिपत्रकात दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात पालकमंत्री, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदर्भातील यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनांसाठी एकसमान सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा वेळा गुरुवारपासून निश्चित केल्या आहेत. जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनांसाठी वेळेची कोणतीही मर्यादा राहणार नाही. तसेच कंटेन्मेंट झोनमधील आस्थापनासाठी पूर्वीच्याच वेळेच्या मर्यादा व अन्य नियम कायम राहतील, असेही श्री. मांढरे यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT