नाशिक

नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

CD
नवीन मतदार नोंदणीसाठी आजपासून दोन दिवस शिबिर सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीसाठी १० व ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी, विशेषतः १८ ते १९ वयोगटातील युवक-युवतींनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे. मतदार यादीत पात्र नागरिकांची नोंदणी व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करतील. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी नमुना ८ तसेच मतदार यादीतील नोंदींशी संबंधित आवश्यक अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १ जानेवारी २०२६ ला किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेले सर्व युवक-युवती नवीन मतदार नोंदणीसाठी फार्म नंबर ६ भरून देऊ शकतात. जिल्ह्यातील कोणताही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र युवक-युवतींसह अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र नागरिकांनी विशेष शिबिरात सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कल्पना ठुबे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

SCROLL FOR NEXT