New Year Party  Sakal
नाशिक

New Year 2024: संकल्पांची पेरणी करत नववर्षाचे स्वागत! हॉटेल्समध्ये तोबा गर्दी; गच्चीवर एकत्र येत पार्टीला पसंती

रात्री बाराच्या ठोक्याला नाशिककरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि केक कापून नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवस्वप्न अन् संकल्पांची पेरणी करत नाशिककरांनी रविवारी (ता. ३१) जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले. कुटुंब, स्नेही, आप्तेष्ट आणि मित्रपरिवारासह नागरिकांनी थर्टी फर्स्ट पार्टी उत्साहात साजरी केली.

रात्री बाराच्या ठोक्याला नाशिककरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि केक कापून नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष केला. कायदा सुरक्षेच्या दृष्टीने शहरभर पोलिसांतर्फे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. (New Year 2024 Welcome New Year by planting resolutions Overcrowding in hotels get together on terrace party nashik)

हॉटेल्समध्ये जागा मिळेना

सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत करताना नाशिककरांच्या आनंदाला उधाण आले होते. थर्टी फर्स्टच्या पार्टीला रविवार आल्याने हा दुग्धशर्करा योग ठरला. विशेषतः तरुणाई या जल्लोषासाठी आतुर होती.

त्यामुळे सकाळपासूनच पार्टीची लगबग दिसून आली. शहरातील सर्वच हॉटेल्समध्ये मोठ्या संख्येने ग्राहक येतील, या दृष्टीने नियोजन आखण्यात आले होते. हॉटेलचालकांनी विविध योजना ग्राहकांसाठी ठेवल्या होत्या.

सायंकाळपासून नागरिकांनी मोठ्या संख्येने हॉटेल्समध्ये गर्दी केली. अनेकांनी आधीच आपला टेबल देखील राखीव करून ठेवला होता. काहींना एक तास वेटिंग करावे लागले. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज, इटालियन, साऊथ इंडियन यांसह मांसाहारावर नाशिककरांनी ताव मारला.

नववर्षाचे गच्चीवरून स्वागत

थर्टी फर्स्टची पार्टी म्हटल्यानंतर कुटुंबीय, मित्रपरिवारासह उत्साहात साजरी केली जाते. बऱ्याचदा हॉटेल्समध्ये गर्दी असल्याने जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या घर, सोसायटीच्या गच्चीवर एकत्र येत नववर्षाचे स्वागत करणे पसंत केले.

शहरातील अनेक ठिकाणी सोसायटीच्या गच्चीवर कुटुंब, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवाराने एकत्र येत पार्टीचे नियोजन केले. जेवणाचा आस्वाद घेतला. या वेळी संगीत, नृत्य, गायन करत नागरिकांच्या आनंदाला उधाण आले.

आम्ही नवीन वर्षाचे स्वागत गुढीपाडव्याला करणार

इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत असले तरी मराठी नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला सुरू होते.

मात्र यंदा समाजमाध्यमांवर अनेक पोस्ट फिरताना दिसून आल्या, ज्यात आपले नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते, त्यामुळे नवीन वर्षाचा उत्सव अन् शुभेच्छा या गुढीपाडव्यालाच देणार, असा मजकूर प्रामुख्याने आढळला.

अशा पोस्ट जरी फिरत असल्या तरी शहरभरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT