Mobile Network Problem esakal
नाशिक

Nashik News : नवीन वर्षात ग्राहकांना connectivityचा मनस्ताप; अभोणा परिसर अनेक दिवसांपासून Not Reachable

सकाळ वृत्तसेवा

अभोणा : येथील परिसरात गेल्या आठवड्यापासून बीएसएनएल व इतर खासगी कंपन्यांचे नेटवर्क विस्कळित झाल्याने संपर्क व आर्थिक व्यवहारच पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विस्कळित सेवेमुळे ग्राहकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नवीन वर्षात ग्राहकांना नेटवर्क तर दूरच पण साधी कनेक्टिव्हिटी सुद्धा बीएसएनएल व इतर खासगी कंपन्या देऊ शकल्या नाहीत. वारंवार संपर्क करूनही संपर्क होत नाही आणि झालाच तर आवाजही ऐकू येत नाही. यामुळे सर्वत्र अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सध्या संपर्काची ही स्थिती असल्यानंतर आर्थिक बाबतीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (New Year Consumer face Network Connectivity Problem Aboha Area Not Reachable Nashik News)

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक व कळवण मर्चंट बँक, तसेच काही पतसंस्था या बीएसएनएल व काही खासगी कंपनीच्या नेटवर्क, इंटरनेट सुविधेने जोडल्या आहेत. परंतु बऱ्याचवेळा नेटवर्क नसल्याने कनेक्टिव्हिटीच नसते. असलीच तर अतिशय कमी स्पीड असल्याने कोणतेही बँकिंग व्यवहार करताना कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

धनादेश क्लिअरन्सही होत नसल्याने, अतिरिक्त दंड सोसावा लागतो. गुगल पे,फोन पेचा आधार असणाऱ्यांचे व्यवहारही क्लिअर होत नाहीत. खेड्यातून पैसे काढण्यासाठी आलेले ग्राहक दिवसभर रांगेत बसून राहत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म व इतर ऑनलाइन फॉर्म भरताना व शालेय कामकाजात महाडीबीटी, सेवार्थ, सरल डाटा, ऑनलाइन आधारकार्ड अपडेशन करण्यासाठी कनेक्टिव्हिटी अभावी सर्वांची अडचण झाली आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

शिष्यवृत्तीसाठी लागणारे शासकीय दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांना सतत चकरा माराव्या लागतात. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटर मोबाईल स्टार्टरवर कनेक्ट केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना नेटवर्क अभावी रात्री-बेरात्री शेतात पाणी सोडण्यासाठी जीव धोक्यात घालून मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर जावे लागते. त्यामुळे बीएसएनएलसह खासगी नेटवर्क व इंटरनेट सेवा सुरळीत व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

"गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलची कनेक्टिव्हिटीच नाही. केवळ नंबर चालू राहावा म्हणून विनाकारण बिल भरल्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. शासकीय दाखले घेण्यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या बोजवाऱ्याने पालक व विद्यार्थ्यांना सतत चकरा माराव्या लागत आहेत."

- ललित मुसळे, सेतू कार्यालय संचालक, अभोणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT