more holidays  esakal
नाशिक

Nashik News : चाकरमान्यांसाठी नववर्ष ठरणार पर्वणी; नववर्षात 125 सुट्ट्या!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नवीन वर्षात ३६५ दिवसांपैकी शासकीय तसेच सार्वजनिक अशा १२५ सुट्ट्या आहे. त्यामुळे शासकीय तसेच, निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या चाकरमान्यांची जणू यंदाचे वर्ष पर्वणी ठरणार आहे. (New Year will be celebration for servants 125 holidays in New Year Nashik Latest Marathi News)

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

येत्या काही दिवसात नवीन वर्षात सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने बाजारात दिनदर्शिका देखील विक्रीस दाखल झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय सुट्ट्यांचे यादी अर्थात परिपत्रक राज्य सरकारतर्फे प्रसारित करण्यात आले आहे. त्यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासह विविध धार्मिक सणांना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या अशा तब्बल २५ शासकीय सुट्ट्या, स्थानिक प्रशासन स्तरावरील ४ अशा २९ शासकीय सुट्ट्यांसह शनिवार आणि रविवार ९६ सार्वजनिक अशा १२५ सुट्ट्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

अर्थात त्यांना केवळ २४० दिवस काम करावे लागणार आहे. अशा सर्व सुट्ट्यांचा विचार केला तर शासकीय कर्मचाऱ्यांना केवळ १५० ते २०० दिवस कामे करावी लागणार आहे. त्यानिमित्ताने बहुतांशी कर्मचाऱ्यांकडून आत्तापासूनच नवीन वर्षाच्या दिनदर्शिका घेऊन सुट्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सुट्ट्यांमुळे कुठेतरी शासकीय कामांवर परिणाम होणार आहे. एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी चार सुट्ट्या आहे.

बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्टी

मार्च एंडिंग निमित्ताने ३१ मार्चला उशिरापर्यंत बँकेचे व्यवहार सुरू असतात. त्यानंतर कार्यालयीन कामे होत असतात. या एकाच दिवशी कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो. त्यानिमित्ताने १ एप्रिलला केवळ बँकेस अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT