नाशिक

नाशिक : नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्वीकारला पदभार

नाशिकचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारला आहे.

कुणाल संत

नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईत बदली महिला सुरक्षा व प्रतिबंध विभागात बदली झाली. तर त्यांच्या जागी महत्वाच्या व्यक्ती सुरक्षा विभागाचे मुंबई येथील पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (ता. 21) नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारला आहे.

नाशिकमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हे माझ भाग्य समजतो. आताच पदभार स्वीकारला आहे त्यामुळे सर्वप्रथम सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार, सर्व परिस्थीती समजून घेत कामकाज सुरु ठेवणार असे प्रतिपादन नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

आधीच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भातही सर्व माहिती व चर्चा करुन नागरिकांच्या हिताच्या योजना कायम ठेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गृह विभागातर्फे बुधवारी (ता.२०) राज्यातील १४ विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली. त्यामध्ये महत्वाच्या व्यक्ती सुरक्षा विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकचे मावळते पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT