satish kulkarani Google
नाशिक

महापौर साहेब! असं आमचं काय चुकलं हो! सिडकोवासियांची आर्त हाक

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : महापौर साहेब! असं आमचं काय चुकलं हो, ज्यामुळे तुम्ही आमच्या सिडकोच्या विकासात भर टाकणाऱ्या उड्डाणपुलाची परवानगीच रद्द करण्याचे पत्र थेट आयुक्त साहेबांना दिले ते! असाच काहीसा नाराजीचा सूर सध्या अधिकांश कामगार वसाहत असलेल्या सिडकोतील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षात सिडकोच्या विकासात भर टाकणारा एकही प्रोजेक्ट महापालिकेने राबविला नाही, ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. (News about the letter by mayor to cancel the permission for construction of flyovers at CIDCO)

वास्तविक भाजपची केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्ता होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवून सिडकोवासीयांनी सीमा हिरे यांना दोनदा आमदार केले. शिवाय २०१७ च्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच जास्तीचे ८ नगरसेवक निवडून दिले. असे असतानाही आजपर्यंत एकही मोठा प्रोजेक्ट अथवा कुठल्याही प्रकारे डोळ्यात भरतील, अशी विकासकामे सत्तेतील भाजपने राबविले नाही. उलटपक्षी उड्डाणपुलांना खो घालण्याचे काम महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले, हे सिडकोवासीयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तथापि, सिडकोच्या विकासाचा सेतू ठरू पाहणाऱ्या दिव्या अॅडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल ते वेद मंदिरापर्यंतच्या प्रस्तावित उड्डाणपुलाला विरोध दर्शविण्याचे काम महापौरांनी केले. किमान महापौरांनी तरी अशा प्रकारे विकासाला विरोध करायला नको होते. त्यात एक बरे झाले की, तुम्ही महासभेत याची कबुली तरी दिली. अन्यथा विकासाचा सतत आग्रह धरणाऱ्या भाजपचे महापौर विकासकामांना विरोध करतील, यावर कुणाचा विश्वास बसला नसता. असो महापौर साहेब ‘झालं गेलं गंगेला मिळाले’ आता कमीत कमी उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनाला तरी नक्की यावे आणि आपल्याच शुभास्ते नारळ फोडावा, हीच सिडकोवासीयांची माफक अपेक्षा तरी आपण आता पूर्ण करावी, अशी इथल्या जनतेची इच्छा आहे.

(News about the letter by mayor to cancel the permission for construction of flyovers at CIDCO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT