NSK26H32530
धुळे : वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करताना विक्रेता बांधव.
-----------
वृतपत्र विक्रेते ज्ञान अन् माहितीचा संदेशवाहक
वृत्तपत्र विक्रेता दिनी माहिती घरोघरी पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासह ज्ञान, माहिती आणि जनजागृतीचा प्रसार करण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार धुळे येथे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांनी काढले. वृत्तपत्र विक्रेता दिनीनिमित्त विक्रेता बांधवांच्या कार्याचा या वेळी गौरव करण्यात आला. दररोज पहाटेपासून ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या विषयी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वृत्तपत्र विक्रेते हे वितरण व्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे वाचकांपर्यंत दररोज ताज्या बातम्या पोहोचतात. समाजप्रबोधन आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीत वृत्तपत्रांचे महत्त्व असून, हे कार्य वाचकांपर्यंत पोहोचविण्यात विक्रेत्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे या वेळी मान्यवरांनी सांगितले. सोहळ्यास संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जैन, कोषाध्यक्ष शिरीष जैन, सल्लागार संदीप सोंजे, खजिनदार वसंत वाणी आणि प्रसिद्धीप्रमुख राजू पाटील, मेहबूब पठाण, वसंत चौधरी, सुधीर साळुंखे, नितीन कुलकर्णी, सुशील खैरनार, प्रभाकर जैन, अमोल सोंजे, योगेश वाणी, दत्तू गावडे, भारत शेडगे, संतोष वाघमोडे, नंदकुमार वैद्य, यशवंत कोकणी, जगदीश सोनवणे, दिलीप बाविस्कर, रमेश चव्हाण, दिलीप खिवसारा यांच्यासह वृत्तपत्र विक्रेता बांधव सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.