नाशिक

निफ्ट प्रवेश परीक्षा अर्जाची १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत

CD
निफ्ट प्रवेश परीक्षा अर्जाची १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत फॅशन डिझाइन क्षेत्रात राष्ट्रीयस्‍तर संस्‍थेतून शिक्षणाची संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या विविध पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘निफ्ट प्रवेश परीक्षा २०२७’ होणार आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना १६ नोव्‍हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पदवी अभ्यासक्रम, बॅचरल ऑफ डिझाइन (बी. डेस.) आणि बॅचरल ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमध्ये फॅशन क्षेत्रातील एम. डेस., एम.एफ.एम. आणि एम.एफ.टेक आदी विविध अभ्यासक्रमांना या प्रवेश परीक्षेतून संधी मिळणार आहे. देशभरातील शंभर शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट संगणकावर आधारित पद्धतीने, तर क्रिएटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्ट पेन-आणि-पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये होणार आहे. इन्‍फोः महत्त्वाच्‍या तारखा अशा - नियमित शुल्कासह अर्जाची अंतिम मुदत- १६ नोव्हेंबरपर्यंत - विलंब शुल्‍कासह अर्जाची मुदत- २१ नोव्हेंबरपर्यंत - अर्जात दुरुस्तीची मुदत- २२ ते २५ नोव्हेंबर - प्रवेशपत्राची उपलब्‍धता- ४ जानेवारी २०२७ - प्रवेश परीक्षेची संभाव्‍य तारीख- १० जानेवारी २०२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT