रात्री घरी आल्यावरून एकाचा खून
---
पती-पत्नीसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : रात्री घरी आल्यावरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा निघृण खून करण्यात आला. ही घटना शेलकुई (ता. धडगाव) येथे घडली. या प्रकरणी पती-पत्नीसह मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. योगेश सुकलाल पावरा (वय २३, रा. धानखेडीपाडा, रोपमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास योगेश पावरा शेलकुई येथील रहिवासी सेंदा डोनश्या पावरा यांच्या घरी गेला होता. योगेशला पाहिल्यावर एवढ्या रात्री माझ्या घरी का आलास, असा जाब सेंदा याने विचारला व वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर भांडणात झाले. सेंदा पावरा याने त्याची पत्नी आणि मुलीच्या मदतीने योगेशला जबरदस्तीने घरात पकडून नेले. तेथे धारदार हत्याराने योगेशवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मृत योगेशचा भाऊ सुनील पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात सेंदा डोनश्या पावरा, त्याची पत्नी आणि मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.