नाशिक

डॉ. निलेश जेजुरकर जामीनासाठी न्यायालयात

CD
डॉ. नीलेश जेजूरकर जामिनासाठी न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायालयात उद्या सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले त्यांचे पती व मुख्य संशयित डॉ. नीलेश जेजूरकर यांनी जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सोमवारी (ता. १९) सुनावणी होणार आहे. डॉ. मनीषा जेजूरकर यांनी ६ मार्च २०२६ ला सकाळी गंगापूर रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत डॉ. जेजूरकर यांची बहीण रोहिणी थोरात यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी १८ सप्टेंबर २०२६ ला जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजूरकर यांना, तर २० सप्टेंबरला या विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही अटक झाली होती. डॉ. चव्हाण यांना गेल्या १० तारखेला पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर जामिनावर सुटका झाली. त्यामुळे आता डॉ. नीलेश यांनीही जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यावरील युक्तिवादांना सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता. १९) पुन्हा त्यावर सुनावणी हाेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT