नाशिक

शेतकरी ज्ञानवृद्धीसाठी निंबाळकरांचा पुढाकार

CD
शेतकरी ज्ञानवृद्धीसाठी निंबाळकरांचा पुढाकार वार्सा, ता. ५ : ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ तसेच शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी सातत्याने कार्यरत असलेले निलेश भास्करराव निंबाळकर यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत युरोप आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली होती. १६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या अभ्यासदौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड व नेदरलँड्स या देशांना भेट देऊन तेथील आधुनिक कृषी पद्धती, तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि कृषी व्यवसायातील विविध उपक्रमांचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची माहिती या दौऱ्यातून मिळाली. या माध्यमातून मिळालेले ज्ञान आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निंबाळकर यांचा प्रयत्न आहे. या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासदौऱ्यात सहभाग घेतल्याबद्दल दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र कृषी विभागातर्फे निलेश निंबाळकर यांना अधिकृत प्रमाणपत्र व मानपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुरज जगताप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT