Burnt Roitra at Nimon. esakal
नाशिक

Nashik News: निमोणकरांना 5 महिन्यापासून रोहित्राची प्रतिक्षा! आंदोलनाचा इशारा

जनावरांसह महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील निमोण येथे महावितरण कंपनीच्या कारभाराचा अजब कारभार पाहावयास मिळत आहे. येथील पाच महिन्यांपासून जळालेला रोहित्र अजूनही बदलून मिळालेला नसल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

त्यामुळे तत्काळ हे रोहित्र बदलून देत वीजपुरवठा सुरळीत करावी अन्यथा जनावरांसह महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी निमोण ग्रामस्थ यांनी दिला आहे. (Nimon people been waiting for Rohitra for 5 months Warning of agitation at mahavitaran Nashik News)

निमोण येथील रोहित्र हे पाच महिन्यापूर्वी जळाले होते. रोहित्र बदलून मिळावे म्हणून येथील ग्रामस्थांनी महावितरणाकडे तशी मागणी देखील केली होती. मात्र या घटनेला पाच महिने उलटून देखील अद्यापही निमोणकरांना रोहित्र बदलून मिळालेले नाही.

रोहित्र न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसह पिण्याची पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. रोहित्र जळालेला असल्याने ट्रान्सफॉर्मर जळालेला असल्याने वीजपंप चालू करता येत नाही.

पर्यायाने पाणी काढता येत नाही. स्वत:ची व जनावरांची तहान भागविण्यासाठी महिला व ग्रामस्थ यांना दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे.

या परिसरातील विहिरींमध्ये उन्हाळ्यापासून काही प्रमाणात पाणी तुंबून ठेवलेल्या आहेत. याच विहिरीतील पाण्याचा आधार जनावरांना पाणी पाजण्यासाठी करावा लागत आहे. निमोण हे दुष्काळी भागात मोडते.

त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्यात चार महिने पाणी नसते. विहिरी देखील कोरड्या ठाक पडता. ज्या विहिरींना काही प्रमाणात पाणी आहे. केवळ रोहित्र बदलून न मिळाल्याने वीजपंप सुरु करता येत नसल्याने पाणी काढता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वितरण व्यवस्थेसंदर्भात रोष आहे. जर महावितरणने तत्काळ या भागातील रोहित्र बदलून दिले नाही तर जनावरांसह कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

"निमोण येथील दोन क्रमांकाची बाराहाते डिपी पाच महिन्यांपूर्वी जळालेली आहे. पण तिथल्या शेतकऱ्यांनी वीजबिले भरले नसल्याने त्यांना रोहित्र बदलून देण्यात आलेले नाही."

- सोमनाथ मासूळ, वायरमन, निमोण

"पाच महिन्यांपासून जर रोहित्र जळालेला असेल तर आतापर्यंत मिळायला हवा होता. आमच्याकडे इतक्या दिवस मागणी प्रलंबित राहत नाही. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करत गावाला तत्काळ रोहित्र उपलब्ध करून दिले जाईल."

- उमेश पाटील, सहाय्यक अभियंता, चांदवड उपविभाग

"आमची डिपी पाच महिन्यांपासून जळालेली आहे. ती अजूनही मिळालेली नाही. अनेकवेळा मागणी करूनही मिळालेला नाही. आता आमच्या जनावरांना प्यायलाही पाणी नाही. माणसांना ही पाणी नाही. जर आमची डिपी बदलली गेली नाही तर महावितरण कार्यालयात ठिय्या मांडू."

गोरखनाथ सोनवणे, शेतकरी, निमोण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT