नाशिक

घात - अपघात

CD
तंटामुक्ती अध्यक्षाला निमशेवडीत मारहाण मालेगाव : तालुक्यातील निमशेवडी शिवारातील खदानीच्या खड्ड्यातून शरद दयाराम कन्नोर हा १ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास टँकरमध्ये पाणी उपसा करुन भरत होता. येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल नथु कन्नोर (वय ७६) यांनी गावातील गुरे व नागरीकांसाठी पाणी शिल्लक राहावे या उद्देशाने त्यास पाणी घेऊन जाण्यास विरोध केला. याचा राग आल्याने त्याने त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. २ नोव्हेंबरला सकाळी सातला विठ्ठल हे त्यांचा मुलगा राजेंद्र याच्यासोबत दुचाकीने जात असतांना शरदने त्यांना पुन्हा शिवीगाळ केली. शरदचा भाऊ अभिमन, वडील दयाराम लक्ष्मण कन्नोर, भाचा आकाश युवराज मासुळ हे तेथे आले. त्यांनी दोघांना शिवीगाळ करुन दगड डोक्यास मारला. आकाशने राजेंद्रचा हात ओढून जमिनीवर पाडले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. वाहनातील बेशुध्द प्रवाशाचा प्रवासात मृत्यू मालेगाव : मालेगाव - मनमाड रस्त्यावरील मयुर हॉटेलसमोर चंदन यादव (वय ४१, रा. शहापूर, जि. भोजपूर बिहार) हे त्यांच्या गाडीत (एनएल ०१ ए ८६४३) बेशुध्द अवस्थेत मिळून आले. हॉटेल समोर रस्त्यावर गाडी उभी असतांना ही बाब लक्षात आली. त्यांचे पाहुणे रविंद्र यादव व रुग्णवाहिकाचालक गणेश शेवाळे यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. भामरे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. -------- रमजानपुरा भागात तरुणाचा मृत्यू मालेगाव : येथील रमजानपुरा भागातील सुफिया परवीन मोहम्मद इस्राईल (वय ३४) या महिलेला २ नोव्हेंबरला दुपारी तीनला प्रसुतीसाठी येथील शिफा हॉस्पीटलमध्ये दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ३ नोव्हेंबरला पहाटे तीनला तिला धुळे येथील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिने कन्येला जन्म दिला. यानंतर उपचारादरम्यान तब्येत खालावल्याने सकाळी पाऊणेसातला डॉ. मिशेल बोग यांनी तपासून सुफियाला मयत घोषीत केले. रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नाेंद झाली आहे. ------ कोठरे बुद्रुक येथे दुचाकी लंपास मालेगाव : कोठरे बुद्रुक (ता. मालेगाव) येथील साहेबराव गुलाब तवर (वय ४३) यांची ३० हजाराची स्प्लेंडर दुचाकी (एमएच ४१ वाय ६४५६) चोरट्यांनी चोरुन नेली. ३ नोव्हेंबरला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वडनेर (ता. मालेगाव) येथील मराठी शाळेच्या गेटजवळून चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली. वडनेर खाकुर्डी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ----- चंदनपुरी भागात गुटखा जप्त मालेगाव :चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील दोस्ती अमृततुल्य जनरल स्टोअर्सवरुन पोलिसांनी ५ हजार २७२ रुपयांचा गुटखा, पान मसाला, तंबाखू पाऊच जप्त केले. ३ नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई प्रविण पुंड यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलिस ठाण्यात राहुल समाधान महाले याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : नागपुरात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' रॅली

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT