नाशिक महापालिका sakal
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता

मनपाकडून साडेचारशे संस्थांकडे पत्राद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीसाठी कर्मचारी उपलब्ध करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता लक्षात घेऊन विविध शासकीय, निमशासकीय साडेचारशे संस्थांना पत्र लिहून तशी मागणी नोंदविण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीला विलंब झाला असला तरी सध्या प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आल्याने निवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडतील, असे बोलले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्य शासनाचा ओबीसीचा ठराव फेटाळताना राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका नियमित घेण्याची सूचना केली आहे.

सोमवारी राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची घोषणा केली. त्यामुळे निवडणुकीविषयी विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट सूचना न आल्याने त्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वीच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक महापालिकेने शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था अशा शासकीय व निमशासकीय अशा साडेचारशे संस्थांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांची मागणी नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, निवडणुका होतील की नाही असा कयास लावत प्रतिसाद मिळतं नसल्याने अखेर महापालिकेकडून पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले. साडेचारशेपैकी दोनशे संस्थांनी महापालिकेच्या पत्राला प्रतिसाद दिला, तर अडीचशे विभागाकडून अद्याप कुठलेच उत्तर न आल्याने या संस्थांना स्मरणपत्र पाठविले जाणार आहे.

१,५५० बूथ, नऊ हजार कर्मचारी

महापालिका निवडणुकीसाठी १, ५५० बूथ राहतील असे गृहीत धरण्यात आले आहे. एका बुथवर पाच ते सहा कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने सात हजार ७५० कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामासाठी लागेल, असा अंदाज आहे. नियमानुसार १५ टक्के राखीव कर्मचारी ठेवावे लागतात, त्यानुसार साधारण नऊ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आक्रमक; सुनावणीत नेमकं काय घडतंय?

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

Shivsena SC Hearing LIVE Updates : ‘२०१८ ची रचना मान्य असेल, तर १९९९ च्या पक्षघटनेकडे का वळलात?’; सिब्बलांचा आक्रमक युक्तिवाद

Dombivli News: पेशवेकालीन तोफा पुन्हा मलंगगडावर, प्रशासकीय चौकशी सुरू असतानाच ऐतिहासिक वस्तू मंदिर प्रांगणात

SCROLL FOR NEXT