नाशिक

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत निफाडचा समावेश

CD
OZM26B14862 मुंबई ः निफाड तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देताना आमदार दिलीप बनकर ------------- ३०-२ दुष्काळग्रस्त यादीत निफाडचा समावेश झाल्यामुळे दिलासा --------- बनकर ः सर्व सवलतींचा लाभ मिळणार --------- सकाळ वृत्तसेवा निफाड- ओझर, ता.१५ ः राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या यादीत अखेर निफाड तालुक्याचा समावेश झाला आहे. आमदार दिलीप बनकर यांनी यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेवेळोवेळी पाठपुरावा केला होता. दरम्यान या समावेशामुळे आता तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेला सर्व सवलतींचा लाभ मिळतील असे आमदार बनकर यांनी म्हटले आहे. यंदाच्या हंगामात पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यात प्रथम ट्रिगर आणि द्वितीय ट्रिगरबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार शासनाने राज्यातील सुमारे ३०५ तालुके हे दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत प्रथम निफाड तालुक्याचा समावेश नव्हता, तो करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे. शासनाने यापूर्वी ‘ट्रिगर-१’अंतर्गत जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत निफाडचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी निफाड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींकडे तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT