नाशिक

निफाड तालुक्यात ३४ बिबटे जेरबंद; हल्ल्यांचे सत्र कायम

CD
सेकंड मेन बिबट्याचे चित्र घ्यावे.... निफाड तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच ३४ बिबटे पकडले; निफाड, येवला, चांदवड वनपरिक्षेत्रात ५७ पिंजरे; वर्षभरात दहा हल्ले सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. २७ ः ऊस आणि मका पिकांचे वाढते क्षेत्र, झुडपे तसेच काटेरी वनस्पतींनी व्यापलेल्या परिसरामुळे तालुक्यात बिबट्यांचा वावर कायम आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यासह जनजागृतीचे उपक्रम राबविले जात असले, तरी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. निफाड-येवला आणि चांदवड या दोन वनपरिक्षेत्रांशी संबंधित गावांची आकडेवारी एकत्रित केल्यास आतापर्यंत ३४ बिबट्यांना पकडण्यात यश आले असून, दोन्ही विभागांत मिळून ५७ पिंजरे उपलब्ध आहेत. निफाड-येवला वनपरिक्षेत्राशी जवळपास १२२ गावे जोडलेली आहेत, तर निफाड तालुक्यातील आणखी १२ गावांचा समावेश चांदवड वनपरिक्षेत्रात होतो. या दोन्ही विभागांमध्ये बिबट्यांना पकडण्यासाठी स्वतंत्रपणे उपाययोजना केल्या जातात. निफाड-येवला विभागात ३० पिंजरे उपलब्ध असून, आतापर्यंत १४ बिबटे पकडण्यात आले आहेत. चांदवड विभागात २० बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. निफाड-येवला वनपरिक्षेत्रांतर्गत शिंगवे, शिवडी आणि खेरवाडी येथे वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या तीन घटना घडल्या. या घटनांमध्ये नागरिक जखमी झाले. चांदवड विभागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या जवळपास सात घटना घडल्या. अशा प्रकारे दोन्ही विभागांतील हल्ल्यांची संख्या जवळपास दहा होते. चांदवड विभागात आतापर्यंत तीन बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ऊस, मका, दाट झुडपे आणि काटेरी वनस्पतींनी व्यापलेल्या भागात बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा मिळते. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन यांना धोका निर्माण होतो. पिकांना पाणी देणे, ऊसतोडणी करणे आणि जनावरांना चरायला नेणे अशा कामांवेळी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. बिबट्यांचा वावर आणि मानवी सुरक्षितता यांचा समतोल राखण्यासाठी वन विभागाने दोन्ही परिक्षेत्रांतील आकडेवारी नियमितपणे जाहीर करून दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ........... चौकट प्रभावी उपाययोजनांची गरज निफाड-येवला विभागात वन्यजीव सप्ताहासह आतापर्यंत २० जनजागृती कार्यक्रम झाले आहे. या कार्यक्रमांतून नागरिकांना बिबट्यांपासून बचाव करण्याचे उपाय आणि आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जाते. मात्र, जनजागृतीनंतरही बिबट्यांचा वावर कायम असल्याने प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. संवेदनशील गावांत नियमित गस्त, बचावपथके, पशुधनाच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण प्रबोधन यावर भर देणे गरजेचे आहे. ............. प्रतिक्रिया....... बिबट्यांचा वावर असलेल्या भागात नागरिकांनी सतर्क राहावे. शेतात काम करताना काळजी घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्यांपासून बचावासाठी वन विभागाकडून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे. विशाल कुटे, चांदवड वनपरिक्षेत्र ............................................... चौकट निफाड-येवला वनपरिक्षेत्र १२२ गावे ३० पिंजरे १४ बिबटे पकडले तीन हल्ले २० जनजागृती कार्यक्रम ......... चांदवड वनपरिक्षेत्र निफाड तालुका- १२ गावे २७ पिंजरे २० बिबटे पकडले सात हल्ले अपघातांत तीन बिबट्यांचा मृत्यू ..... एकूण आकडेवारी १३४ गावे ५७ पिंजरे ३४ बिबटे पकडले दहा हल्ल्यांच्या घटना .........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BP Singh Passes Away: CIDचे निर्माते-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, प्रेक्षकांचे लाडके बी. पी. सिंह यांचं निधन; मनोरंजन विश्वात शोककळा

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

Satana News : आदिवासी गावांच्या पाणीप्रश्नावर ‘एसएनएफ’ची धडपड; हास्यजत्रेच्या मदतीने जलप्रकल्पांना बळ

Water Scarcity: ३६ तासांची पाणीकपात ५५ तासांवर, उल्हासनगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका

SCROLL FOR NEXT