Dilip Bankar esakal
नाशिक

Niphad Sub District Hospital : निफाडचे उपजिल्हा रूग्णालय आता 100 खाटांचे! दिलीप बनकर

सकाळ वृत्तसेवा

Niphad Sub District Hospital : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांवरून १०० खाटा करत अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ३९.८९ कोटीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

यामुळे तालुक्यातील जनतेला अधिक विस्तारित स्वरूपात आरोग्यसेवा मिळणार आहेत. (Niphad Sub District Hospital now 100 beds mla Dilip Bankar nashik news)

निफाड येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आमदार बनकर हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाने काही महिन्यापूर्वी त्या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यास २०२१-२२ च्या दरसूचीनुसार मान्यता देण्यात आली आहे.

या अंदाजपत्रकामध्ये इमारत बांधकामासह, रेनवाटर हार्वेस्टिंग, फर्निचर, पाणीपुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक उपाययोजना, पार्किंग, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व गेट, वातानुकूलित यंत्रणा इत्यादींसाठी तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या इमारत बांधकामासाठी एकूण ३९ कोटी ८९ लाखांच्या अंदाजपत्रक अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित विभागाने मान्यता दिली आहे. निफाडमध्ये नव्याने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे निफाड शहर व तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा व उपचार तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान निफाडवासियांच्या सुविधांसाठी शासनाने दिलेल्या मान्यतेविषयी निफाड तालुक्यातर्फे आमदार बनकर यांनी आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT