NSK26H33806
जळगाव : शोभायात्रेत सहभागी कलशधारी महिला.
.......
शहरात निष्कलंकी धामच्या उत्सवाला सुरूवात
कल्की भगवानांच्या मूर्ती, ग्रंथाची शोभायात्रा; १ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : शहरातील शिव कॉलनी परिसरातील सतपंथ ज्योत मंदिर श्री निष्कलंकी धाम येथे १७ व्या वार्षिक उत्सवाला बुधवारी (ता. २८) रोजी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. श्री निष्कलंकी नारायण भगवान अर्थात कल्की भगवान यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जयघोष, धार्मिक उत्साह आणि विविध कलाविष्कारांमुळे शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले.
महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, संत विजय प्रकाश महाराज, आचार्य सचिनजी महाराज, डॉ. श्रीकांत रत्नपारखी महाराज, संत अरविंद महाराज, रवींद्र महाराज महाले, आमदार सुरेश भोळे आणि माजी महापौर सीमा भोळे यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता शोभायात्रा काढण्यात आली. नायगव्हाण-फुलंब्री येथील सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेच्या शंभर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक कलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दीपप्रज्वलन, कथेला प्रारंभ आणि मूर्तीचा जलाधिवास विधी पार पडला.
चौकट
१ नोव्हेंबरपर्यंत धार्मिक सोहळा
उत्सवांतर्गत २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी तीन ते सहा या वेळेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृतवाणीतून ‘भज गोविंदम्’ सत्संग होणार आहे. या महोत्सवात मूर्ती प्राणप्रतिष्ठा, यज्ञयाग, पूजा, कथा आणि संतमेलन असे विविध कार्यक्रम होईल. भाविकांनी या सोहळ्यात सहभागी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.