nitin gadkari e sakal
नाशिक

नाशिक : द्वारका ते नाशिकरोड थेट उड्डाणपूल; नितीन गडकरींची घोषणा

विक्रांत मते

नाशिक : शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक रोडच्या दत्तमंदिर ते द्वारका या ५.९ किलोमीटरवर आता थेट उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत (Bharatmala Project) हा उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटरवरून केली. थेट उड्डाणपुलामुळे नाशिक ते नाशिक रोडच्या वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न मार्गी लागणार असून, याच एलिव्हेटेड उड्डाणपुलावरून मेट्रो चालविण्याचे नियोजन केले जाणार आहे.

नाशिक महापालिकेची भौगोलिक सीमा निश्‍चित करताना नाशिक रोड-देवळाली पालिकेचा समावेश करण्यात आला. तीस वर्षांत दोन्ही उपनगरे नववसाहतींमुळे एकजीव झाल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली. नाशिक-पुणे महामार्गावरील काठे गल्ली, पौर्णिमा, बोधलेनगर, शिवाजीनगर, डॉ. आंबेडकरनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगरपुढे नाशिक रोडपर्यंतचे रोज हजारो नागरिक नाशिक ते नाशिक रोडदरम्यान प्रवास करतात. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन प्रदूषण, अपघाताच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) सर्वेक्षण करून काठे गल्ली, फेम सिनेमा, नेहरूनगर व बिटको महाविद्यालयासमोर छोटे उड्डाणपूल तयार करण्याचा अहवाल सादर केला होता. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देत प्रस्ताव रेंगाळला. तसेच गांधीनगर, नेहरूनगर या केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या मिळकतींच्या जागा मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याने प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता अधिक होती. त्यानंतर निधीच्या पूर्ततेसाठी भारतमाला प्रकल्पांतर्गत नाशिक रोड ते द्वारका असा थेट उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव ‘न्हाई’ने सादर केला. त्यानुसार केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला प्रकल्पाच्या योजना क्रमांक एकमध्ये ४०४ किलोमीटरचा चंबळ एक्स्प्रेस हायवे तसेच मध्य प्रदेशातील झांसीमार्गे जाणाऱ्या १६.८ किलोमीटर ग्रीन फिल्ड महामार्गाबरोबरच द्वारका ते नाशिक रोड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील ५.९ किलोमीटर उड्डाणपुलाचा समावेश केल्याची माहिती ट्विटरवरून जाहीर केली.

मेट्रोसह वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार

पुणेकडून नाशिककडे येणाऱ्या अवजड वाहनांच्या गर्दीमुळे काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. मुंबई, जळगाव तसेच पुणेकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे द्वारका भागात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार नित्याचेच होते. पोलिस आयुक्त कार्यालयाने पुणेकडून येणारी अवजड वाहनांची वाहतूक फेम सिग्नलपासून डाव्या व उजव्या बाजूने वळविली असली तरी उपनगरांमध्ये वाहनांची गर्दी वाढली आहे. आता थेट उड्डाणपुलामुळे अवजड वाहतूक पुलावरून वळवून वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे.

पाठपुराव्याला यश

खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे. वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी श्री. गडकरी यांची भेट घेऊन वाहतुकीच्या प्रश्‍नाचे गांभीर्य पटवून दिले होते. भारतमाला योजनेतून रस्त्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला शिफारस करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यास भाग पाडले. त्यातून प्रस्तावित उड्डाणपुलाला तत्त्वतः मान्यता देऊन सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे.

नागपूरच्या धर्तीवर विकास

नागपूर शहरात उड्डाणपुलावर मेट्रो कार्यरत आहे. याच धर्तीवर प्रस्तावित उड्डाणपुलावर मेट्रोची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि नॅशनल हायवे एकत्रितपणे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT