Nitin Gadkari Devendra Phadnavis esakal
नाशिक

Nashik News : जिथे प्रकल्पांना विरोध, तिथेच होताय संच!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात एकीकडे वीज प्रकल्पासाठी विरोध होत असताना जिथे संचांची गरज आहे, तेथे संच दिले जात नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते, अशी भावना एकलहरे पंचक्रोशीतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

विदर्भात प्रदूषणाच्या कारणावरून कोराडी येथील प्रकल्प इतर ठिकाणी हलवावा, याबाबत नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. नुकतेच त्यांनी यासंदर्भात पत्रही दिले आहे. (Nitin Gadkari demanded from Energy Minister and Deputy Chief Minister Devendra Fadnavis to tansfer koradi project nashik news)

कोराडी येथे दोन हजार १९० मेगावॉट , खापरखेडा- एक हजार ३४०, खासगी उद्योगांचे पाच हजारांहून अधिक मेगावॉट प्रकल्प विदर्भात आहेत. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने नागपूर येथील पर्यावरणवादी संघटनांचा या प्रकल्पास विरोध आहे.

येत्या काही दिवसांतच या ६६० च्या दोन प्रकल्पासाठी जनसुनावणी होणार आहे. यासंदर्भात कोराडी येथील ६६० चे दोन संच पारशिवनी येथे हलविण्याची मागणी श्री. गडकरी यांनी केली आहे.

ग्रीड स्टॅबिलिटीसाठी नाशिक औष्णिक वीज केंद्रात संच होणे आवश्यक असताना वीज महाग पडत असल्याच कारण देऊन बारा वर्षांपासून येथील प्रस्तावित प्रकल्पाचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले आहे.

नाशिक वीज केंद्रातील टप्पा क्रमांक एकमधील दोन संच बंद करण्यात येऊन येथे ६६० मेगावॉटच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. मात्र कागदोपत्रीच्या पुढे या प्रकल्पाचे काम पुढे सरकलेला नाही. जितक्या वेळा सरकार बदलले तितक्या वेळा नाशिकवासीयांच्या पदरी फक्त आश्वासने पडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यास हजारो नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राचा मेरिट ऑर्डर डिस्पॅच वाढलेले नाही. एमईआरसी पॅरामीटरर्स साध्य करण्यात वर्षानुवर्षे यश मिळविले आहे. नवीन संच आल्यास वीजनिर्मिती दर सर्व यंत्रसामग्री नवीन असल्याने कमी राहतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

"विदर्भात वीज प्रकल्पांना विरोध होत असताना जिथे संचाची गरज आहे, तिथे संच दिले जात नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? हजारो लोकांची रोजीरोटी अवलंबून असलेल्या नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित संच होणे गरजेचे आहे."- सरोज अहिरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT