Nitin Pawar while guiding the meeting about non-inclusion of Dhangar community in tribal reservation. Neighbor Gyandev Pawar esakal
नाशिक

Nashik News: धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नकोच : नितीन पवार

धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश न करण्याबाबत मेळावा

सकाळ वृत्तसेवा

अभोणा : आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश केल्यास आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी रविवारी (ता. २) येथे दिला.

अभोणा (ता. कळवण) येथील (कै.) ए. टी. पवार आदिवासी सांस्कृतिक भवनात धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश न करण्याबाबत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कळवण बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार अध्यक्षस्थानी होते. (Nitin Pawar statement Dhangars do not want reservation among tribals Nashik News)

आमदार पवार म्हणाले, की धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही; परंतु त्यांनी आदिवासी आरक्षणात समावेश करण्याची मागणी करू नये. धनगर समाज आदिवासी कधीच नव्हता व आजही नाही.

धनगर समाजाच्या नेत्यांनी शासनावर दबाव आणून आमच्या आदिवासी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही शांत बसणार नाही.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार एकत्र आले असून, सर्व आमदार आदिवासी बांधवांबरोबर आहोत. आदिवासींमध्ये धनगर आरक्षणाला आमचाही तीव्र विरोध आहे.

लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. एकलव्य संघटनेचे के. के. पवार, मनोहर गायकवाड, सुदाम भोये, पंडित बहिरम, एम. एल. पवार, भरत चव्हाण, रघू महाजन, जनार्दन भोये, युवराज गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.

आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. माजी आमदार काशीनाथ बहिरम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत गवळी, दिलीप मोरे, युवराज गांगुर्डे, अलका कनोज, मधुकर जाधव, कळवणचे नगरसेवक एम. एल. पवार, जनार्दन भोये, सरपंच सुनीता पवार,

आदिवासी शक्ती सेनेचे अध्यक्ष सुदाम भोये, आदिवासी बचाव अभियानचे चिंतामण गायकवाड, ‘कृउबा’ संचालक दिलीप कुवर, सरपंच रमेश बागूल, शिवाजी चौरे, वामन चौधरी, लताबाई पवार, साहेबराव गांगुर्डे, विष्णू बागूल, फुलाजी बागूल, रमेश गावित, एकनाथ पालवी, शशी बागूल, शांताराम चौरे, रवींद्र बहिरम, संजय खिल्लारी, जिभाऊ वाघ, शांताराम चौरे आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सुरेश ढुमसे, शांताराम बागूल, देवेंद्र ढुमसे, हरिभाऊ चव्हाण, उत्तम चव्हाण, रामदास पवार, पी. पी. साबळे, नामदेव जोपळे, केतन जोपळे, सागर गायकवाड, सौरभ बागूल, पंकज बागूल आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT