NMC hammer on encroachments
NMC hammer on encroachments esakal
नाशिक

Nashik : सिडकोत अतिक्रमणांवर हातोडा

राजेंद्र बच्छाव

सिडको (जि. नाशिक) : महापालिकेच्या (NMC) अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे (Department of Encroachment Elimination) बुधवारी (ता. २२) सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्सदरम्यान असलेल्या शंभर फुटी रस्त्यावर अतिक्रमणावर हातोडा घालण्यात आला. (NMC Action on encroachments in CIDCO Nashik News)

अंबड औद्योगिक वसाहत, मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स आणि पुढे प्रणय स्टम्पिंग कंपनीदरम्यानचा हा रस्ता आहे. वाढती वाहतूक लक्षात घेता महापालिकेने रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. अतिक्रमित घरे आणि दुकाने या माध्यमातून अनेक व्यवसायिक आणि घरमालकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होत होती. काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत बहुतांश अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

ज्या घरमालक तसेच दुकानमालकांनी अतिक्रमण स्वतःहून काढले नाही त्यांच्या अतिक्रमणावर सहाही विभागांतील अतिक्रमण पथकाच्या मदतीने आणि पोलिस बंदोबस्तात विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात कामटवाडे परिसरातील मनपाच्या मीनाताई ठाकरे शाळेजवळ असलेले भंगारचे दुकान, चिकन-मटन विक्रीची दुकाने, मार्बलचे देव्हारे तसेच इतरही शोच्या वस्तूंची दुकाने हटविण्यात आले. या वेळी महापालिका कर्मचारी आणि दुकानमालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वाद मिटविल्यानंतर अतिक्रमित दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. मथुरा लॉन्ससमोरील काही घरमालकांनी रस्तारुंदीकरणाच्या कामात अडथळे निर्माण केले होते, तेदेखील हटविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT