NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: महापालिका कोणीतरी ऑपरेट करतेय; म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेत तांत्रिक संवर्गातील विभाग उपायुक्तांच्या अधिनिस्त करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी सेनेने संशय व्यक्त करताना महापालिका कोणीतरी बाहेरून ऑपरेट करत असल्याचा आरोप संघटनेचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. (NMC being operated by someone else Allegation of Municipal Employees Army nashik)

महापालिकेत प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याच्या नावाखाली तांत्रिक संवर्गातील विभाग उपायुक्तांच्या अधिनिस्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी ५ सप्टेंबरला घेतला होता.

आयुक्तांच्या निर्णयामुळे अभियंता संवर्गात संतापाची भावना निर्माण झाली होती. कमी वेतन व कमी अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांच्या अधिनिस्त विभाग करणे हा अपमान असल्याचे बोलले गेले.

यासंदर्भात १२ सप्टेंबरला बैठक होऊन म्युनिसिपल कर्मचारी सेनेने प्रशासनाची चूक निदर्शनास आणून दिली. तांत्रिक संवर्गातील उपअभियंता व उपायुक्तांची वेतनश्रेणी समान आहे. कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता या दोन्ही पदांवर काम करणारे वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये येतात.

त्यामुळे उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली वरिष्ठ तांत्रिक संवर्गातील अधिकारी काम करणार नाही. त्यामुळे झालेली चूक दुरुस्त करावी, अशी मागणी केली होती.

४ ऑक्टोबरला यासंदर्भात आयुक्तांनी आदेश काढून उपायुक्तांच्या अधिनिस्त आणलेले तांत्रिक विभाग पुर्ववत केल्याने संघटनेकडून आयुक्तांचे आभार मानताना महापालिका बाहेरून कोणी ऑपरेट करते का, अशी शंका व्यक्त केली.

"महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ, वरिष्ठांमध्ये वाद निर्माण करून आर्थिक आमिषाने बदली केली जात आहे. कोणावर अन्याय होणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे."- सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT