water connection esakal
नाशिक

Nashik News : NMCने 6 दिवसात तोडल्या 76 नळ जोडण्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने या कालावधीमध्ये अपेक्षित महसूल वसुलीचे उद्दिष्ट दृष्टिपथात येत नसल्याने अखेरीस विविध विभागाने कारवाईचा बडगा भरला आहे. शहरात पाणीपट्टीची थकबाकीदार असलेल्या ७६ नळ जोडण्या तोडण्यात आल्या. (NMC broke 76 water supply connections in 6 days Nashik News)

यंदाचा अंदाजपत्रकामध्ये पाणीपट्टीच्या माध्यमातून ७५ कोटी रुपयांची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सुधारित अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने महसूल वसुलीचे आकडेवारी मागविण्यात आली. त्यात ७५ कोटी रुपयांच्या उद्दिष्ट टाकायची जेमतेम ३५ कोटी रुपये वसूल झाले आहे.

ही बाब समोर आल्यामुळे पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ५८ लाख रुपयांच्या वसुलीसाठी २३२ नळजोडणी धारकांना नोटिसा बजावल्या. एक ते सहा जानेवारी या कालावधीमध्ये १५६ थकबाकीदारांनी तीस लाख रुपयांची रक्कम जमा केली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

७६ थकबाकीदारांनी थकबाकी अदा न केल्याने नळ जोडण्या तोडण्यात आल्या. पाणीपट्टीप्रमाणेच मालमत्ता कराची १८० कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. त्याअनुषंगाने ७६ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहा विभागात एकूण ४७ मालमत्ता धारकांना वॉरंट काढले आहे.

त्या माध्यमातून बारा लाख रुपये वसूल झाले. वॉरंट बजावल्यानंतर २१ दिवसांच्या आत मिळकत धारकांनी थकबाकीचा भरणा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर थकबाकी अदा न केल्यास चालू बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मूल्यांकन करून लिलाव प्रक्रिया राबविली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT