While inaugurating the Papad festival, Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar, Senior Economist Dr. Vinayak Govilkar and others esakal
नाशिक

Nashik News : महापालिकेच्या मोकळे भूखंड बचतगटांसाठी : आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महिलांसाठी महापालिकेने बचतगटांचा स्वतंत्र विभाग स्थापन केलेला असून यामार्फत महिलांना पूर्ण सहकार्य केले जाईल.

इतकेच नव्हे तर शहरात महापालिकेचे मोकळे भूखंड हे महिला बचतगटांसाठी उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. (NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar statement Vacant plots of NMC for Savings Groups Nashik News)

सहकार भारती, राणी भवन आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने लक्षिका लॉन्स येथे शुक्रवारी (ता.१४) पापड व वाळवण खाद्यपदार्थ महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी उद्योजिका वीणा माजगावकर, श्रीगुरूजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, महापालिकेच्या उपायुक्त डहाळे, विश्वास रेडिओ संचालक रुचिता ठाकूर, सहकार भारतीच्या अखिल भारतीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई आहिरे उपस्थित होते.

या वेळी महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या जागा आहेत. त्याचा निश्चितपणे महिला बचत गटांना फायदा होईल. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर म्हणाले, महिला मोठ्या उद्योजिका होऊ शकतात.

पण त्यांनी आर्थिक गोष्टींचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयी त्यांनी सांगितले. उद्योजिका वीणा माजगावकर यांनीही महिलांना उद्योग विश्वाशी निगडित महत्त्वाच्या गोष्टी सांगत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या वेळी लक्षिका मंगल कार्यालयाच्या संचालिका वृंदा लवाटे, शुभांगी कुलकर्णी, मंगल सोनवणे, शिरीश भालेराव, शरद जाधव, योगेश शिंदे, मुकुंद गायधनी, रत्नाकर बकरे, प्रकाश क्षिरसागर, संजय सूर्यवंशी, मनिषा मानकर, सुचिता कोकडे, सुरेखा पंढरपूर आदी उपस्थित होते.

पापडाचे ६० स्टॉल्स; आज शेवटचा दिवस

पापड महोत्सवाचा शनिवारी (ता. १५) समारोप होणार असून, त्यात वाळवणीच्या विविध पदार्थांसह पापडाचे तब्बल ६० स्टॉल उभारण्यात आले आहेत.

नाशिकमधील हा पहिलाच पापड महोत्सव असल्याने त्याला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बचतगटाच्या महिलांनी या वेळी सांगितले. शहराच्या विविध भागात अशा महोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी या महिलांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT