Commissioner Dr. who was present during the visit to the municipality during the district tour. Chandrakant Pulkundwar esaka
नाशिक

YIN cabinet meeting | सरकारी मालमत्तेचे संवर्धन, वृद्धी करणे आपल्‍या हाती : डॉ. पुलकुंडवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकांगी विचार न करता सभोवताली घडणाऱ्या घटनांचे विश्‍लेषण करावे. दोन्ही बाजू समजावून घेऊन मत व्यक्त करावे. वैचारिक बैठक पक्की असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावे. सरकारी मालमत्तेचा मालक प्रत्येक व्यक्ती असून, ती मालमत्ता जपणे, त्यात वाढ करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवण्यासह सामाजिक भान निर्माण करण्याचा प्रयत्‍न करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (ता. ९) केले. (nmc commissioner Pulkundwar statement at YIN cabinet meeting about conversation and increase government property Nashik News)

महाराष्ट्राच्या दौयावर असलेल्या ‘यिन’ शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्र्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करताना आयुक्तांनी मार्गदर्शन केले. महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त अशोक आत्राम, उपायुक्‍त अर्चना तांबे यांच्‍यासह ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘यिन’चे प्रभारी मुख्यमंत्री ए. बी. पाटील, महसूलमंत्री रोहित आगळे, वित्तमंत्री अजोरद्दीन शेख, राजशिष्टाचारमंत्री संकेत वाकळे, सहकारमंत्री सागर वाघ, यिनचे संघटनमंत्री वैभव कुशारे, ‘यिन’चे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक गणेश जगदाळे आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, की नवनेतृत्वाने प्रत्येक प्रश्‍नाकडे डोळसपणे पाहणे आवश्‍यक आहे. निःस्पृहपणे प्रत्येक घटनेचे गंभीरपणे विश्‍लेषण केल्यास त्यातून सत्य बाहेर येईल. ‘राइट टू एज्युकेशन’ बरोबरच ‘राइट टू इक्वॅलिटी अर्थात सर्वांना शिक्षण मिळण्यासोबत शिक्षणातील गरीब-श्रीमंत दरी कमी होण्याची गरज आहे. खासगी व सरकारी शाळांची तुलना व्‍हायला हवी. सरकारी अधिकाऱ्यांची मुलेदेखील सरकारी शाळांमध्ये शिकली पाहिजे. नवीन नेतृत्वाने मूलभूत प्रश्‍नांवर अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ब्रिटिशकाळातील मानसिकता झटका

भारत अनेक वर्षे पारतंत्र्यात होता. मुगल, सरंजामशाही त्यानंतर ब्रिटिशांनी अनेक वर्षे राज्य केले. परिणामी, नागरिकांचा शासन व यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक राहिला. स्वातंत्र्यानंतरही सरकार व नागरिक यामध्ये विसंवाद कायम आहे. त्यामुळे सरकारी मालमत्ता लुटण्यासाठीच असल्‍याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची आवशक्यता आहे. सरकारी मालमत्तेचा मालक प्रत्येक नागरिक असून, मालमत्ता जपण्याची जबाबदारीदेखील प्रत्येकाची आहे, असे आयुक्त पुलकुंडवार म्‍हणाले.

बैठक, वैयक्‍तिक भेटींतून साधला संवाद

मंत्रिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांची भेट घेतली. युवकांच्‍या प्रश्‍नांसंदर्भात माध्यमांची भूमिका व प्रश्‍न सोडविण्यासाठी माध्यमांचा प्रभावी उपयोग याविषयावर भेटीत चर्चा केली. यानंतर केटीएचएम महाविद्यालयास भेट देताना प्राचार्य डॉ. व्‍ही. बी. गायकवाड यांच्‍यासोबत शैक्षणिक विषयांसंदर्भात चर्चा केली. यानंतर विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना युवकांशी निगडित प्रश्‍नांवर विचारमंथन केले. या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवा सेनेचे जिल्‍हाध्यक्ष दीपक दातीर, युवक काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष स्वप्नील पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ॲड. संदेश जगताप यांनी सहभागी होताना संवाद साधला. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी केटीएचएम महाविद्यालयातील ‘यिन’च्‍या कोअर टीम सदस्‍यांशी संवाद साधला. नाशिक दौऱ्यात पुढे महंत

अनिकेतशास्त्री महाराज यांची भेट घेतली. युवकांच्‍या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्‍माचे महत्त्व या विषयावर संवाद साधला व दौऱ्याच्या अंतिम टप्प्‍यात सिन्नर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालयाची पाहणी करताना संग्रहालयाचे प्रमुख डॉ. के. सी. पांडे यांच्‍याशी दिलखुलास गप्पा मारल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! झेडपी, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमुळे लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; महिलांना ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार

Diwali Breakfast Recipe: दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुलांसाठी बनवा रागी पराठा बाइट, सोपी आहे रेसिपी

Panchang 22 October 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 ऑक्टोबर 2025

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक, ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात; महिलांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT