NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi news esakal
नाशिक

Nashik : आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सलग दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर अनेक भागात पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेचा बांधकाम पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागांसह स्मार्टसिटी कंपनीच्या असमन्वयावर बोट ठेवत समन्वय साधून प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना घेताना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (NMC Commissioner Pulkundwar warned of disciplinary action construction water supply drainage departments nashik news)

सोमवारी (ता. १०) संध्याकाळी शहरात मुसळधार पाऊस पडला. दोन तासात ७० मिलिमीटर पाऊस पडल्याने शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साठले. असेच परिस्थिती मंगळवारी (ता. ११) देखील कायम राहिली. गावठाण भागामध्ये स्मार्टसिटी अंतर्गत कामे सुरू आहेत, ते कामे अर्धवट स्वरूपात असून पावसामुळे त्या भागात पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडले. या संदर्भात महापालिकेच्या पोर्टलसह नागरिकांनी आयुक्तांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या.

आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनीदेखील काही भागात पाणी दौरे केले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठक घेत बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या तसेच स्मार्टसिटी कंपनीच्या अभियंत्यांची तातडीने बैठक बोलावली. स्मार्टसिटी कंपनीकडून सुरू असलेले कामे अर्धवट स्वरूपात असल्याने गावठाण भागात पाणी ठेवण्याचे प्रकार घडल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून कामे करताना महापालिकेच्या अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. अभियंत्यांच्या तक्रारी लक्षात घेता आयुक्तांनी महापालिकेच्या तीन विभाग व स्मार्टसिटी कंपनीच्या अभियंत्यांना एकमेकांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. असमान आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT