NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi news esakal
नाशिक

Nashik: वसुली झाली तरच सत्कार, अन्यथा खातेनिहाय वसुलीचे पत्र; NMC आयुक्तांचा अल्टिमेटम

विक्रांत मते

नाशिक : विकासकामे करायची असेल तर तेवढ्या प्रमाणात महसूलदेखील हवा. आता उत्सव आटोपले असून, विभागप्रमुखांनी तातडीने घरपट्टी वसूल करावे. डिसेंबर अखेरपर्यंत जे १०० टक्के वसुली करतील त्यांचा सत्कार होईल, मात्र जे वसुली करणार नाही त्यांना पत्र मिळेल असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला. (NMC Commissioner ultimatum to officials over recovery of property tax nashik News)

विभागप्रमुखांची बैठक झाली. या वेळी थकबाकीचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. झालेल्या कामांची देयके देण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. राज्य शासनाकडून जीएसटीच्या माध्यमातून अनुदान प्राप्त होते. मात्र, महापालिकेच्या हक्काचे उत्पन्न असलेल्या मालमत्ता करातून मात्र अपेक्षित वसुली होत नाही.

चालू वर्षाची मागणी व थकबाकी, असे एकूण १५० कोटी रुपयांचे यंदाचे उद्दिष्ट आहे. मात्र, त्यापैकी १०५ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. त्यामुळे आता डिसेंबर अखेरपर्यंत ४५ दिवसात ४५ कोटी रुपयांची वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विविध कर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच विभागीय अधिकाऱ्यांना शंभर टक्के वसुली करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. पाणीपट्टीच्या माध्यमातून ८५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता.

परंतु, आत्तापर्यंत फक्त ३८ कोटी रुपये वसूल झाले आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीच्यादेखील सूचना देण्यात आल्या. महापालिकेचे शहरात सहा विभाग आहेत. त्यातील तीन विभागीय अधिकारी निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत त्यांना शंभर टक्के वसुली करण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT