Citylinc esakal
नाशिक

..तर सिटी लिंक वाहकांना करणार बडतर्फ!

अरूण मलाणी

नाशिक : सिटी लिंकच्‍या (Citylinc) माध्यमातून बस वाहतूक (Bus Travel) सेवा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत १५१ वाहकांना दंड (Penalty) झाला आहे. ६१ वाहकांना कमी केलेले आहे. वाहकाकडून तिसऱ्यांदा चूक घडल्‍यास त्‍यांना सेवेतून काढण्याची तरतूद आहे. यापुढे केवळ सेवा कमी न करता संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासक महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Ramesh Pawar) यांनी दिले आहे. (NMC Commissioners warning in City Linc meeting Nashik News)

सिटीलिंक अधिकाऱ्यांसोबत झालेल्‍या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी महानगर शहर बस वाहतूक सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, महाव्यवस्थापक मिलिंद बंड आदी उपस्थित होते. नागरिकांच्या सेवेसाठी तोट्याचा विचार न करता कर्तव्‍य म्‍हणून बससेवा चालवते. कर्मचाऱ्यांकडून चांगल्‍या पद्धतीने सुविधा देणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांकडून चुका होऊ नये, यासाठी तरतूदी आहेत. यासर्व बाबींचा आढावा आयुक्‍त रमेश पवार यांनी घेतला.

६१ वाहकांची सेवा समाप्त

बससेवेमध्ये काही वाहक प्रवाशांकडून पैसे घेतात, मात्र त्यांना तिकीट देत नाही अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या. या बाबत पहिली चूक आढळल्यास वाहकाला समज देण्यात येते. दुसऱ्यांदा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई तर तिसरी चूक मात्र सदर वाहकाची सेवा समाप्त होते. यापुढे मात्र सेवा कमी करण्यावर न थांबता संबधितांवर गुन्हा दाखल होणार आहे.

विद्यार्थी पासचे नियोजन करा

प्रवासी संख्या अधिक असलेल्‍या मार्गांवर जादा बस सेवा सुरु कराव्‍या. प्रतिसाद नसलेल्‍या मार्गांवरील बसच्‍या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय यावेळी घेतला. शहरात सध्या २१० बस सुरू असून १२ जूननंतर शाळा खुल्‍या होणार आहेत. यावेळी तीस बस सुरू करण्यात येणार आहेत. तर दहा बस राखीव ठेवल्‍या जाणार असून एकूण २४० बस नियमित धावणार आहेत. अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT