NMC News  esakal
नाशिक

NMC Drainage Survey : जूनअखेर आराखडा सादर होणार; आयआयटी पवईच्या पथकाद्वारे पाहणी

सकाळ वृत्तसेवा

NMC Drainage Survey : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीसह उपनद्या व नैसर्गिक नाले प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या मोहिमेंतंर्गत पहिल्या टप्प्यात पाच नैसर्गिक नाल्यांचे प्रदूषण मुक्तीसाठी सर्वेक्षण केले जाणार असून त्यासाठी मुंबईच्या पवई आयआयटी चे पथक नाशिक मध्ये दाखल झाले आहे. (NMC Drainage Survey plan will submitted by end of June Inspection by team from IIT Powai nashik news1)

वाघाडीसह चिखली व मखमलाबाद नाल्याचे सोमवारी (ता. २२) सर्वेक्षण करण्यात आले. रविशंकर मार्गावरील व सुंदरनगर नैसर्गिक नाल्याचे सर्वेक्षण करून जून महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे.

गोदावरी सह उपनद्या व नैसर्गिक नाले प्रदूषण मुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नदी व नाले प्रदूषण मुक्त केले जाणार आहे. प्रदूषणमुक्ती करण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहे.

परंतु ठोस असा निकाल हाती लागलेला नाही. मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर प्रदूषण मुक्त करण्यासाठी आता प्रयोग राबविला जात आहे. त्यासाठी पवई आयआयटीची मदत घेतली जात आहे.

जानेवारी महिन्यात पवई आयआयटीच्या पथकाने भेट देत १९ नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली होती. शहरातील चिखली नाला, कार्बन नाला, चोपडा नाला, मल्हारखान नाला, बजरंगनाला, भारतनगर,

पुणे रोडवरील बजरंगवाडी, फेम चित्रपटगृहामागील नाला, सुंदरनगर, रोकडोबावाडी नाला, चेहडी आदी ठिकाणच्या १९ नैसर्गिक नाल्यासंदर्भात पाहणी केल्यानंतर नैसर्गिक नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर ‘एन-सीटू’ प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्रदूषित आढळलेल्या चिखली, मखमलाबाद, वाघाडी, सुंदरनगर व अशोका मार्गाला लागून असलेल्या श्री श्री रविशंकर मार्गावरील नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यासाठी आयआयटी पवईचे शास्त्रज्ञ अक्षय साळुंखे, अभिजित साळवे यांनी चिखली, वाघाडी व मखमलाबाद येथील नैसर्गिक नाल्यांचे आज सर्वेक्षण केले. नैसर्गिक नाल्यांच्या उगमापासून ते नदीपर्यंतच्या प्रवासाचे अंतर, नाल्यातील प्रदूषणाची पातळी, आदी मोजणी करण्यात आली.

मंगळवारी (ता. २३) श्री श्री रविशंकर मार्ग व सुंदरनगर नैसर्गिक नाल्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर जून महिन्यात महापालिकेला सविस्तर आराखडा सादर केला जाणार आहे.

"गोदावरी व उपनद्या तसेच, नैसर्गिक नाले प्रदूषण मुक्त केले जाणार आहे. त्यासाठी पवई आयआयटीची मदत घेण्यात आली असून तेथील शास्त्रज्ञांनी आज तीन नाल्यांची पाहणी केली. उद्या दोन नाल्यांची पाहणी करून महापालिकेला सविस्तर अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यानंतर कामांना सुरवात होईल."

- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण व पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT