Education officer Sunita Dhangar was being brought to the office of the Anti-Corruption Bureau in a bribery case esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : मनपा शिक्षणधिकारी धनगर अन् लिपिक ACBच्या जाळ्यात; 50 हजाराची लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : लाचखोरांसाठी कर्दनकाळ ठरत असलेल्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आज पुन्हा बडी मछली अडकली आहे.

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर या 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तर त्यांचे लिपिक हे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झाले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी असलेल्या सुनिता सुभाष धनगर (57, रा. 801, रचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक), लिपिक नीतीन अनिल जोशी (45, रा. फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक ) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत

50 वर्षीय तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामि त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या

कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था तक्रारदारास सेवेमध्ये दाखल करून घेत नसल्याने त्यांनी याबाबत मनपा शिक्षण अधिकारी धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी धनगर यांनी सदरबाबत पत्र देणेकामी ५० हजार रुपयाची लाचेची मागणी केली तर, लिपिक जोशी याने सदरील पत्र बनवण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागणी केली. त्याप्रमाणे दोघांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव,. एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी सदरची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT