NMC News  esakal
नाशिक

NMC Recruitment : महापालिका नोकर भरतीची प्रक्रिया सुरू राहणार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी महापालिकेकडून ७०६ पदांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जाहिरात काढली जाणार आहे. (NMC employee Recruitment process will continue during code of conduct nashik news)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अग्निशमन व वैद्यकीय विभागातील अनुक्रमे ३४८ व ३५८ अशा ७०६ पदांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. त्यापूर्वी महापालिकेने अग्निशमन व वैद्यकीय विभागासाठी सेवाप्रवेश नियमावली मंजूर केली. शासनाच्या सूचनेनुसार आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रिक्त पदांची नोकरी भरती होईल की नाही, याबाबत संभ्रम होता. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचण नसल्याचे सांगितले.

आचारसंहितेच्या काळात प्रशासकीय बाबी पूर्ण करून त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT