NMC Flower Festival esakal
नाशिक

NMC Flower Festival : नाशिक महानगरपालिकेच्या ‘पुष्पोत्सव’ आयोजनास हिरवा कंदील!

२००८ पर्यंत पुष्पोत्सव आयोजित केला जात होता. मात्र उद्यान विभागातील कथित टेंडर घोटाळ्यामुळे पुष्पोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मागील दोन वर्षांपासून पुष्पोत्सवाची खंडित झालेली परंपरा यंदा नियमित होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला.

महापालिकेकडून १९९३ मध्ये पुष्पोत्सव भरविण्याची परंपरा सुरू करण्यात आली. २००८ पर्यंत पुष्पोत्सव आयोजित केला जात होता. मात्र उद्यान विभागातील कथित टेंडर घोटाळ्यामुळे पुष्पोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित झाली. (NMC Flower Festival Pushpotsav project gets green light nashik)

२०१९ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. दोन वर्ष पुष्पोत्सव भरविला गेला. परंतु कोरोनामुळे दोन वर्षाच्या आयोजनावर निर्बंध आले.

कोरोना संकट दूर झाल्यामुळे आता उद्यान विभागाने पुन्हा पुष्पोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सव भरविला जाईल.

स्थायी समितीने खर्चाला मान्यता दिली आहे. पुष्पोत्सवांतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे.

गुलाबपुष्पे, कृत्रिम आच्छादनात वाढविलेले गुलाबपुष्पे, मोसमी व वर्षा फुले, कुंडीतील, शोभिवंत वनस्पती, पुष्परचना, कुंड्यांची सजावट अशा विविध गटात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT