NMC News esakal
नाशिक

NMC Hospital Recruitment: दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा प्रतिसाद नाहीच!

सकाळ वृत्तसेवा

NMC Hospital Recruitment : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर व स्टाफ नर्सची कमतरता भरून काढण्यासाठी ५६ डॉक्टर व ४० सहाय्यक असे एकूण ९६ जागा मानधनावर भरल्या जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता.२६) दुसऱ्या दिवशीदेखील डॉक्टर पदासाठी प्रतिसाद मिळाला नाही.

स्टाफ नर्स व एएनएम पदासाठी दोन दिवसात ८३४, तर बीएएमएससाठी ३०१ अर्ज वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाले आहेत. (NMC Hospital staff nurse ANM Recruitment on second day no response from doctor nashik)

महापालिकेच्या माध्यमातून पाच मोठे रुग्णालय, तीस शहरी आरोग्य केंद्रे चालविले जातात. आता त्यात नव्याने १०५ आरोग्य उपकेंद्रांची भर पडणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार मोठा असला तरी डॉक्टर व अन्य पदांचा मोठा बॅकलॉग आहे.

डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर असली तरी सध्या ६५ डॉक्टर कार्यरत आहे. १२४ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६१ पदे रिक्त आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मानधनावर नियुक्ती करण्यासाठी जाहिरात काढण्यात आली.

त्यात ५४ डॉक्टर व ४० सहाय्यकांची पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर व एमबीबीएस डॉक्टरांच्या पदाकडे उमेदवारांनी पाठ फिरविली. शल्यचिकित्सकाच्या दोन पदांसाठी तीन अर्ज प्राप्त झाले.

अस्थिरोगतज्ज्ञ चार पदांसाठी व भूलतज्ज्ञांच्या दोन पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. स्रीरोगतज्ज्ञांच्या पाच पदांसाठी आठ अर्ज दाखल झाले. रेडिओलॉजिस्टच्या दोन जागांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

बालरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल झाले. कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी दोन तर दंत शल्यचिकित्सकांच्या तीन जागांसाठी ७० अर्ज दाखल झाले. वैद्यकीय अधिकारी ( एमबीबीएस) च्या दहा जागांसाठी अवघे दोन अर्ज दाखल झाले.

वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) च्या दहा जागांसाठी तब्बल ३०१ अर्ज दाखल झाले. जीएनएम पदाच्या वीस जागांसाठी २७४ अर्ज दाखल झाले. तर एएनएमच्या वीस जागांसाठी ५६० अर्ज दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT