Corona Updates in Maharashtra esakal
नाशिक

Corona Update : कोरोना परिस्थिती चिंताजनक; वैद्यकीय विभाग पुन्हा सज्ज

विक्रांत मते

नाशिक : शहरात नव्याने एकाच दिवशी ५६ नवीन कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळल्याने रुग्णांचा आकडा ५३९ पर्यंत पोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (NMC medical department) अंग झटकत नव्याने सज्जता केली आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेले कोविड सेंटर (Covid Center) पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. (NMC Medical department reequipped for worrisome Corona situation Nashik corona update news)

मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. या लाटेत ७६ नागरिकांना संसर्ग झाला, तर एक हजाराहून अधिक नागरिकांचा कोविडमुळे बळी गेला. त्यानंतर दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर ठरली. दीड लाखांच्यावर नवीन रुग्ण आढळले, तर ३००० नागरिकांचा दुसऱ्या लाटेत बळी गेला.

जानेवारी महिन्यात तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत नोंदविले गेले. मात्र, त्या लाटेचा फारसा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे व्यवहार पुन्हा सुरळीत झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

जुलै महिन्याच्या १३ दिवसांमध्ये ५३९ कोविड रुग्णांची संख्या नोंदवली गेली. तर, बुधवारी (ता. १३) ५६ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभाग पुन्हा सज्ज झाला आहे. जुने नाशिक भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात सध्या चार रुग्ण उपचार घेत आहेत.

त्या व्यतिरिक्त अन्य रुग्णालयांमध्ये एकही कोविडचा रुग्ण नाही. मात्र, असे असले तरी रुग्णालय तसेच ठक्कर डोम, संभाजी स्टेडिअम आदी ठिकाणची चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT