NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: सिंहस्थ आराखड्यातील अवास्तव प्रस्तावांना ब्रेक! 8 दिवसांत सुधारित आराखडा सादर करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाला आराखडा सादर करावयाचा आहे. त्यासाठी महापालिकेने ४३ विभागांकडून प्रस्तावित कामांची यादी मागितली आहे.

मात्र यात अवास्तव प्रस्ताव असल्याने शासनाकडून फुली मिळण्याऐवजी विभागांनीच परफेक्ट आराखडा सादर करावा, यासाठी पुन्हा आठ दिवस आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहे. (NMC News Break unreasonable proposals in Simhastha scheme Instructions to submit revised plan within 8 days nashik)

२०२७ व २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक साधुमहंतांना सेवा व सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. त्यासाठी महापालिकेला सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करावा लागतो.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आयुक्तांनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठित करण्यात आली.

या समितीने विभागप्रमुखांना संस्थांसाठी लागणारा निधी व प्रकल्पांची माहिती मागविली आहे. ४३ विभागांकडून आज आयुक्तांना प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. आरोग्य, भूसंपादन, बांधकाम, पाणीपुरवठा, घनकचरा, जनसंपर्क आपत्ती व्यवस्थापन विभाग या विभागांनी आराखडे सादर केले.

यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने विभागांनी आपसांत समन्वय साधून सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आराखड्यामध्ये साधुग्रामचे भूसंपादन, तसेच रिंगरोडबाबत स्पष्टता नाही.

साधुग्रामसाठी किती जमीन लागेल, या संदर्भात काय ॲक्शन प्लॅन आहे याबाबतदेखील आराखड्यामध्ये स्पष्टता नाही. महापालिकेव्यतिरिक्त अन्य संस्थांशी संपर्क साधून माहिती सादर करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अवास्तव कामांना कात्री

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेला स्वनिधी खर्च करण्याबरोबरच राज्य व केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र त्यापूर्वी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.

महापालिकेच्या विविध विभागांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालात अवास्तव कामांचा समावेश केल्याने जवळपास आठ हजार कोटींच्या वर प्रकल्पांची किंमत जात असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळेल की नाही, याबाबत संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामांचा समावेश करूनच अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

"सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून आठ दिवसांत सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : अंधेरीत एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

SCROLL FOR NEXT