NMC News  esakal
नाशिक

NMC News: अडचणीवर मात करण्यासाठी साडेचार कोटीचे नवीन वाहन

सकाळ वृत्तसेवा

NMC News : नव्वद मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी महापालिकेला पुरविणारी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर नवीन शिडी खरेदीसाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

यामुळे बांधकामावर परिणाम करणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी कालबाह्य ठरत असलेली ३२ मीटर उंचीच्या शिडीसाठी साडेचार कोटी रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केले जाणार आहे. यांत्रिकी विभागाला त्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. (NMC News Four half crore new vehicle to overcome problem nashik)

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून यापूर्वी २००८ मध्ये ३२ मीटर उंचीपर्यंत पोचणारी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अर्थात शिडी खरेदी केली आहे. महापालिकेला हायड्रोलिक प्लॅटफॉर्म प्राप्त झाल्यानंतर रीतसर प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली.

जुलै २०२३ ला प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनाची फिटनेस टेस्ट करण्यात आली. २०२४ मध्ये पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने नोंदणी रद्द होणार आहे.

त्यामुळे अग्निशमन विभागाने एकिकृत विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे ९० मीटर उंचीपर्यंत पोचणारी हायड्रोलिक शिडी खरेदीचा प्रस्ताव दिला. फिनलँड येथील मे. वेसा लिफ्ट ओये कंपनीला नोव्हेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश दिले.

३१ मे २०२३ पर्यंत सदर कंपनीकडून पुरवठा केला जाणार होता. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने अग्निशमन विभागाला अद्याप हायड्रोलिक शिडी प्राप्त झाली नाही. त्यामुळे पूर्वीचा करार रद्द करण्यात आला.

त्यामुळे अग्निशमन विभागाने नगररचना विभागाला पत्र लिहून नवीन हायड्रोलिक प्लॅटफॉर्म प्राप्त होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या बांधकामांना परवानगी देवू नये, अशी मागणी नगररचना विभागाकडे केली होती.

त्यानुसार नगररचना विभागाचे सहसंचालक कल्पेश पाटील यांनी ३१ ऑगस्टला तशा लेखी सूचना अभियंत्यांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रिअल इस्टेट क्षेत्राचा गळा घोटण्याच्या निर्णयावर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनीदेखील अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत फेरविचार करणार असल्याचे जाहीर केले.

सिंहस्थ आराखड्यात समावेश

नगररचना विभागाच्या दोन वर्षांच्या इमारत बांधकाम बंदीच्या संकटावर मात करण्यासाठी अग्निशमन विभागाने अस्तित्वात असलेला व कालबाह्य होत होणारा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

३२ मीटर उंचीच्या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मकरिता जुने वाहन बदलून नवे वाहन खरेदी केले जाणार आहे. वाहन कालबाह्य ठरणार असले तरी शिडी मात्र दहा वर्षे कार्यरत राहू शकते.

असा यांत्रिक विभागाच्या अहवालाच्या आधारे महापालिकेने देकार मागविले. त्याचबरोबर सिंहस्थ आराखड्यातही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT