While inaugurating the eco-friendly Ganapati stall at the municipal headquarters, Commissioner Dr. Ashok Karanjkar esakal
नाशिक

NMC News: गणेशमूर्ती आमची आणि किंमत तुमची! महापालिकेतर्फे अभिनव संकल्पना

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेने यंदा गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित केला असून पर्यावरणपूरक शाडूच्या मुर्ती अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘गणेशमूर्ती आमची आणि किंमत तुमची’ संकल्पनेच्या माध्यमातून शहरात मुर्ती दिल्या जाणार आहेत.

महापालिका मुख्यालयात बुधवारी (ता. १३) आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. (NMC News Ganesha idol ours and price yours innovative concept by Municipal Corporation nashik)

या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पर्यावरण विभागप्रमुख तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, कर उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता नितीन वंजारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, माजी विभागीय अधिकारी दिलीप मेणकर आदींसह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

योगेश कमोद यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्टचे वंदना व हेमंत जोर्वेकर दांपत्याने या ठिकाणी शाडू माती व लाल मातीच्या मुर्ती उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘गणेशमूर्ती आमची आणि किंमत तुमची’ संकल्पनेतून मूर्ती नागरिक, गणेशभक्तांना उपलब्ध होणार आहेत.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील मुख्य प्रवेशद्वार जवळील वाहनतळ येथे व सर्व विभागीय कार्यालयांत विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात मूर्ती माफक दरात उपलब्ध राहणार आहेत.

गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्टॉलवरून पहिली मूर्ती खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT