NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News : ऑनलाइन बांधकाम परवानगीचा बार फुसका; 4 दिवसांपासून यंत्रणा बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेकडून वाजतगाजत सुरू झालेल्या ऑनलाइन बांधकाम परवानगीचा बार अवघ्या चोपन्न दिवसात फुसका ठरल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार दिवसांपासून यंत्रणा बंद पडली असून नेमकी यंत्रणा बंद पडली की बंद पाडण्यास भाग पाडली गेली याबाबत नगररचना विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे. (nmc Online construction permit system closed from 4 days nashik news)

राज्य शासनाने युनिफाईड डीसीपीआर मंजूर करताना बांधकाम परवानगी ऑनलाइन पद्धतीने देणे बंधनकारक केले आहे. सुरवातीला नाशिक महापालिकेसाठी ऑटो डीसीआर सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले होते. रडतखडत सहा महिने यंत्रणा चालली. त्यातील त्रुटी बाहेर आल्या.

अखेरीस शासनाकडे बांधकाम व्यावसायिकांनी धाव घेऊन नवीन सॉफ्टवेअर देण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने बीपीएमएस ही नवी कार्यप्रणाली उपलब्ध करून देण्यात आली. तोपर्यंत ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात नगर रचना विभागातून प्रकरणे मंजूर झाली. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून १३ एप्रिल २०२३ पासून बांधकाम परवानगीची प्रकरणे ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेतली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या कालावधीमध्ये ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रस्ताव दाखल होण्याची प्रमाण कमालीचे घटले. २०२२ मध्ये ऑफलाइन परवानगीतून नगररचना विभागाला २४४ कोटी रुपये महसूल मिळाला.

परंतु ऑनलाइन बांधकाम परवानगीची पद्धत सुरू झाल्यानंतर प्रस्ताव दाखल करण्याचे प्रमाण घटल्याने त्याचा परिणाम उत्पन्न कमी होण्यावरदेखील झाला. आता मागील चार दिवसांपासून ऑनलाइन प्रणाली बंद झाली आहे. प्रणाली बंद पडली की, ऑफलाइन बांधकाम परवानगीसाठी बंद पाडली गेली याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे.

"सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी ऑनलाइन बांधकाम परवानगीची प्रक्रिया बंद आहे. येत्या दोन-तीन दिवसात प्रक्रिया सुरळीत होऊन पुन्हा ऑनलाइन परवानगी दिली जाईल." - संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT