Railway Ticket Office & NMC esakal
नाशिक

Railway Ticket Office : सेंट्रल रेल्वेकडे NMCची 27 लाखांची थकबाकी! तिकीट कार्यालय हलविण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांच्या थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सेंट्रल रेल्वेने महापालिकेच्या गाळ्यांमध्ये सुरू केलेल्या तिकीट विक्री केंद्राकडे २६ लाख ९० हजार रुपयांचे भाडे थकले आहे.

थकबाकीची रक्कम कमी करण्याच्या मागणीला नकार देण्यात आल्यानंतर कार्यालय गुंडाळण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (NMC owes 27 lakhs to Central Railway Preparing to move ticket office nashik news)

नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळपास १२ किलोमीटर अंतरावर नाशिक रोड रेल्वेस्थानक आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे पंचवटी, गोदावरी, राज्यराणी, तसेच पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने तिकिटासाठी रांगेत उभे राहिल्यास गाड्या सुटण्याचे प्रकार होत होते.

त्यामुळे नाशिकमधील प्रवाशांसाठी तिकिटाची स्वतंत्र व्यवस्था शहरात उपलब्ध व्हावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्या अनुषंगाने सेंट्रल रेल्वेने प्रथमत: रविवार कारंजा भागात व कालांतराने तिबेटियन मार्केटमधील महापालिका कॉम्प्लेक्समध्ये चार गाळे घेऊन तेथून तिकीट विक्रीचे केंद्र सुरू केले.

या केंद्रामार्फत तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षनिय झाली. त्यामुळे कायमस्वरूपी तिकीट विक्री केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. परंतु, भाडेवाढीचे मोठे संकट निर्माण झाले. उच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा आधार घेऊन महापालिकेने रेडीरेकनरच्या दरापेक्षा अधिक आठ टक्के दराने भाडे आकारणी केली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परिणामी, आत्तापर्यंत २६ लाख ९० हजार रुपये भाडे थकले. दरम्यान, भाडे कमी करण्यासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. तिकीट विक्री केंद्राचे भाडे कमी केल्यास अन्य संस्थादेखील याच न्यायाने भाडे कमी करण्याची मागणी करतील.

न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशाचे पालन होणार नसल्याने महापालिकेने बॅक फुटवर येत नियमानुसार भाडे आकारण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे तिकीट विक्री केंद्राबाबत रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, खासगी गाळ्यांचे भाडे सरकारी दरापेक्षा कमी असल्याने तिकीट विक्री केंद्र महापालिकेच्या इमारतीमधून हलविण्याची तयारी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT