NMC Promotion esakal
नाशिक

NMC Promotion: जम्पिंग प्रमोशनचा बार उडविण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

NMC News : दोन वर्षांपूर्वी महापालिकेत तांत्रिक संवर्गात जम्पिंग प्रमोशनचा बार उडविल्यानंतर आता पुन्हा उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर त्यात कार्यकारी अभियंता पदावर तीन उपअभियंत्यांना बसविण्याची तयारी झाली आहे.

याविरोधात अभियंत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची लाट निर्माण झाली असून, प्रमोशनच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी करण्यात आली आहे. (NMC Preparing to set bar for jumping promotions nashik)

दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनात पदोन्नती कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये जम्पिंग प्रमोशनचा बार उडविण्यात आला. तांत्रिक संवर्गात मोठ्या प्रमाणात जम्पिंग प्रमोशन देण्यात आल्याने त्यातून आर्थिक उलाढाल झाली.

तत्कालीन प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी जम्पिंग प्रमोशनचा बार उडवून मोठ्या प्रमाणात कमाई केल्याचे चर्चा सुरू आहे. तोच कित्ता आता पुन्हा गिरविण्याची तयारी सुरू झाली आहे.

उपअभियंता पदावर कार्यरत असलेले रवी पाटील यांची पदोन्नती डावलून कार्यकारी अभियंता पदावर सचिन जाधव यांना बसविण्यात आले. याविरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

स्थगिती उठल्यानंतर पदोन्नती कमिटीची बैठक होऊन यामध्ये यापूर्वी शाखा अभियंता पदावरून उपअभियंता पदावर जम्पिंग प्रमोशन घेतलेल्या महापालिकेच्या तीन उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक रोड बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी, राजेश पालवे तसेच नितीन राजपूत या तिघांना कार्यकारी अभियंता पदावर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे.

याविरोधात अभियंत्यांनी एकत्र येत न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. अभियंता संवर्गात सध्या सुरू असलेल्या बदलांच्या राजकारणावरून महापालिका मुख्यालयात प्रशासकीय कामकाजाविरुद्ध संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT