Eye Infection esakal
नाशिक

NMC School: डोळे आल्यास विद्यार्थ्यांना 4 दिवसांची सुट्टी द्यावी; महापालिकेचे शाळांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

NMC School : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ सुरू असून महापालिका हद्दीमध्ये जवळपास आठशेहून नेत्ररुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका शिक्षण विभागाकडून शहरी भागातील शाळांना विशेष सूचना देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास चार दिवस सक्तीची सुट्टी द्यावी व ती सुट्टी भरून काढण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली. (NMC School Students should be given 4 days off in case of eyes Municipal Corporation letter to schools nashik)

राज्यात डोळे येण्याची साथ सुरू आहे. विशेष करून लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. बुधवारी (ता. २) प्राप्त झालेल्या अहवालानुसार एक लाखाहून अधिक या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये मंगळवारी तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वीही जवळपास ५०० नेत्र रोगाचे रुग्ण आढळून आले. सदर नोंद महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, बिटको हॉस्पिटल, स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी व पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालयातील आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचबरोबर महापालिकेच्या ३० आरोग्य केंद्रातदेखील रुग्णांची नोंद घेतली जात आहे. मुंबई, पुणे, ठाणेपाठोपाठ नाशिकमध्ये डोळ्यांचे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यात एखाद्या विद्यार्थ्याला डोळे आल्यास त्याला चार दिवसांची सुट्टी द्यावी व ते वाया गेलेले शैक्षणिक चार दिवस अन्य मार्गाने भरून काढावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT