NMC Swimming Pool esakal
नाशिक

NMC Swimming Pool : महापालिकेचे जलतरण तलाव ‘हाउसफुल’! महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू

सकाळ वृत्तसेवा

NMC Swimming Pool : कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेली महापालिकेचे जलतरण तलाव आता पूर्ण क्षमेतेने खुली झाली असून, उन्हाळी सुटीमुळे हाउसफुल झाले आहेत. जलतरण तलावावर महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू करण्यात आले आहे.

जलतरण तलावावर प्रशिक्षित जीवरक्षक, जलनिर्देशक, पाण्याची उत्तम गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहे. (NMC Swimming Pool Separate batches for women started nashik news)

नाशिक रोड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजमाता जिजाऊ तरण तलाव, त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, सातपूर येथील जलतरण तलाव येथे पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू करण्यात आल्या आहेत.

नाशिक रोड, त्र्यंबक रोडवरील तरण तलावात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पूल आहेत. तेथे एकूण सहा बॅच सुरू आहेत. सातपूर, सिडको येथे मात्र सिंगल पूल आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेला चारही तलावांच्या व्यवस्थापनामधून २ कोटी १४ लाख ७१ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्यात निम्मे उत्पन्न १ कोटी ३ लाख रुपये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाद्वारे मिळाले आहे. पुरुषांसाठी ५० बाय २५ फूट आकाराचा तर महिलांसाठी २५ बाय २३ फूट आकाराचा पूल आहे. १ एप्रिलपासून चारही तरण तलाव मिळून सुमारे २,५०० जणांनी लाभ घेतला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी, मासिक पासधारक, वार्षिक पासधारक यांचा समावेश आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वेळेनिहाय बॅचेस

राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव- रेग्युलर बॅच- सकाळी ६.३० ते १०.३०, सायंकाळी ५ ते ७, स्पेशल बॅच सकाळी १०.३० ते १२.३०, रात्री ७ ते ८.३०. स्वामी विवेकानंद सिडको, सातपूर तरण तलाव- महिलांसाठी- सकाळी ९.३० ते १०.३०, सायंकाळी.
४ ते ५. पुरुषांसाठी सकाळी ६.३० ते ९.३०, सायंकाळी ५ ते ७.

"तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. नाशिककर पालकांनी मनपाच्या जलतरण तलावांतील सुविधांचा लाभ घेऊन पाल्यांचा जरूर प्रवेश घ्यावा, महिला वर्गानेही स्पेशल बॅचेसचा लाभ घ्यावा." - रूपचंद काठे, मुख्य व्यवस्थापक, जलतरण तलाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT