NMC workers esakal
नाशिक

Nashik : अनाधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई

अरुण मलाणी

नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर (hoardings) कठोर कारवाई करण्याची भूमिका महापालिका (NMC) प्रशासनाने घेतली आहे. त्‍याअनुषंगाने रविवारी (ता. २२) कॅनडा कॉर्नर परिसरातील महापालिकेच्‍या अतिक्रमण (Encroachment) विभागामार्फत रहदारीस अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक काढण्यात आले आहे. अशीच आक्रमक भूमिका यापुढे कायम राहणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे. (NMC take action on unauthorized hoardings Nashik News)

प्रशासक तथा महापालिका आयुक्‍त रमेश पवार (NMC Commissioner) यांनी काही दिवसांपूर्वीच विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. अधिकारांमध्ये वाढ केल्‍यानंतर या विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईबाबत स्‍पष्ट सूचना केल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महापालिकेच्‍या अतिक्रमण विभागामार्फत सातत्‍याने विविध भागांमध्ये कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. विविध बाजारपेठांतील वर्दळीच्‍या ठिकाणांवर रहदारीला अडथळा ठरतील असे जाहिरात फलक जप्त केले जात असून, संबंधित व्‍यावसायिकांवर कारवाईदेखील केली जाते आहे. अशात रविवारी महापालिका अतिक्रमण विभागामार्फत कॅनडा कॉर्नर येथील रहदारीस अडथळा करणारे जाहिरात फलक काढण्यात आले. आगामी काळातही अशाच स्वरूपात कारवाई सुरु राहणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे.

राजकीय फलकबाजीवरही हवा लगाम

गेल्‍या काही दिवसांपासून शहरात पुन्‍हा राजकीय फलकबाजी सुरू झालेली आहे. अशात अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. अन्‍य विविध परिसरात केल्‍या जात असलेल्‍या कारवाईप्रमाणेच राजकीय पक्षांशी निगडित फलकबाजीबाबतही कठोर भूमिका घेत या प्रकाराला आवर घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT