NMC Tax Recovery esakal
नाशिक

NMC Tax Recovery : गांधीगिरीतून एका दिवसात 11 लाखांची वसुली

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : नाशिक महापालिका सिडको विभागाअंतर्गत पाथर्डी उपविभागीय कार्यालयातर्फे उपायुक्त कर अर्चना तांबे आणि विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घर, पाणीपट्टी थकबाकी असणाऱ्यांच्या दारात ठिय्या देत थकबाकी भरेपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेत सुरू केलेल्या गांधीगिरीमुळे एक दिवसात विक्रमी ११ लाख १४ हजार ९३९ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली. (NMC Tax Recovery of 11 lakhs in one day from Gandhigiri nashik news)

थकबाकीदारांना वारंवार नोटिसा आणि तगादे लावूनही ते भरणा करत नव्हते. अशा थकबाकीधारक यांच्याबाबत व्यापक मोहीम राबविण्यात आली. या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या दरबारी ठिय्या मांडून गांधीगिरी पद्धतीने मोहीम राबविली.

प्रभारी कर निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी थकबाकीदारांना थकीत कर भरण्याबाबत आणि कटू कारवाई टाळण्याबाबत आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एकाच दिवसात ९ लाख १९ हजार ७७२ रुपये घरपट्टी आणि १ लाख ९५ हजार १६७ रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले.

दरम्यान, पाणीपट्टी आणि थकबाकीदारांचे नळजोडणी कट करण्यात आले. मोहिमेत वरिष्ठ लिपिक दीपक कोथमिरे, प्रशांत राऊत, साजिद शेख, कांबळे, सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT